ETV Bharat / sitara

टायगर - हृतिकच्या 'वॉर'चा टीजर पाहुन भारावले जॅकी श्रॉफ, दिली प्रतिक्रिया - teaser

मोठ्या पडद्यावर पहिल्यांदाच टायगर आणि हृतिक एकमेकांसमोर येत आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना या चित्रपटाबद्दल कमालीची उत्सुकता आहे.

टायगर - हृतिकच्या 'वॉर'चा टीजर पाहुन भारावले जॅकी श्रॉफ, दिली प्रतिक्रिया
author img

By

Published : Jul 15, 2019, 7:49 PM IST

मुंबई - बॉलिवूडचे दोन अॅक्शन हिरो हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ लवकरच पडद्यावर एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. दोघे सोबत झळकणार असल्याच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून समोर येत होत्या. मात्र, त्यांच्या चित्रपटाचे नाव जाहीर करण्यात आले नव्हते. आज त्यांच्या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित करुन चित्रपटाचे नावदेखील समोर आले आहे.
'वॉर' असे त्यांच्या आगमी चित्रपटाचे नाव आहे. चित्रपटाच्या टीजरमध्ये टायगर आणि हृतिकची दमदार झलक पाहायला मिळते. तसेच या चित्रपटात त्यांची जुगलबंदी पाहायला मिळणार असल्यामुळे चाहत्यांना देखील फार उत्सुकता आहे. टीजर रिलीज झाल्याबरोबर लाखो चाहत्यांनी या टीजरवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. खुद्द जॅकी श्रॉफ यांनीही या टीजरवर प्रतिक्रिया दिली आहे.

टायगरला हृतिकसोबत काम करताना पाहुन जॅकी श्रॉफ खुपच भारावले आहेत. त्यांनी या चित्रपटाचा टीजर शेअर करुन एक पोस्ट लिहिली आहे. ते म्हणतात, की 'ज्यावेळी मी 'किंग अंकल' चित्रपटात भूमिका साकारत होतो, तेव्हा हृतिक फक्त १९ वर्षांचा होता. तो राकेश रोशनसोबत या चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शन करत होता. त्यावेळी टायगर फक्त दोन वर्षाचा होता. टायगरला लहानपणापासूनच हृतिक फार आवडतो. आज तो त्याच्यासोबत भूमिका साकारतोय, याचे फार अप्रुप वाटतेय'.

मोठ्या पडद्यावर पहिल्यांदाच टायगर आणि हृतिक एकमेकांसमोर येत आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना या चित्रपटाबद्दल कमालीची उत्सुकता आहे. एका माध्यमाशी बोलताना टायगर म्हणाला होता, की हृतिक त्याची प्रेरणा आहे. त्याच्यासोबत भूमिका साकारताना तो फार नर्व्हस होता.

'वॉर' हा एक अॅक्शनपट असणार आहे. यामध्ये अभिनेत्री वाणी कपूर देखील झळकणार आहे. २ ऑक्टोंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.