ETV Bharat / sitara

Order of POSCO Special Court : महेश मांजरेकर यांच्या अडचणीत वाढ, अश्लील चित्रणाबद्दल तपासाचे पोलिसांना आदेश - मुंबईतील पॉस्को स्पेशल कोर्टाचा आदेश

दिग्दर्शक महेश मांजरेकर ( Filmmaker Mahesh Manjrekar ) यांचा नवीन चित्रपट 'वरन भात लोन्चा कोन नाय कोन्चा'च्या टीम ( Varan Bhat Loncha Kon Nai Koncha ) विरुद्ध मुंबईतील पॉस्को स्पेशल कोर्टाने मुंबई पोलिसांना यांना सीआरपीसी कलम नुसार 156 (3) प्रमाणे प्रकरणाचा तपास करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे महेश मांजरेकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

फोटो महेश मांजरेकर  इन्स्टाग्राम सौजन्याने

author img

By

Published : Feb 18, 2022, 7:44 PM IST

मुंबई - महेश मांजरेकर ( Mahesh Manjrekar ) यांचा चित्रपट 'वरण भात लोन्चा कोन नाय कोन्चा' हा ( Varan Bhat Loncha Kon Nai Koncha ) मराठी चित्रपट वादात सापडला आहे. गिरणी कामगारांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटांमध्ये बोल्ड दृश्यामुळे पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. या चित्रपटांमध्ये महिला आणि लहान मुलांचे आक्षेपार्ह चित्रण दाखवण्यात आल्यामुळे याविरोधात मुंबई सत्र न्यायालयातील पॉस्को न्यायालयात ( POSCO Special Court ) गुन्हा दाखल करण्यात यावा याकरिता याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर आज मुंबई सत्र न्यायालयाने महेश मांजरेकर यांच्याविरोधात चित्रपटातील दृष्या संदर्भात तपास करण्याचे आदेश माहीम वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना दिले आहेत.

या चित्रीकरणाच्या विरोधात भारतीय स्त्री शक्ती संघटनेच्यावतीने गुन्हा दाखल करण्याकरिता याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आज न्यायालयाने निर्णय दिला आहे. भारतीय स्त्री शक्ती संघटनेचे वतीने वकील प्रकाश सालसिंगीकर ( Lawyer Prakash Salsingikar ) यांनी युक्तिवाद केला आहे.

भारतीय स्त्री शक्ती संघटनेचे वकील प्रकाश सालसिंगीकर

चित्रपट निर्माते महेश मांजरेकर यांच्यासह या चित्रपटात काम करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून करण्यासंदर्भात मुंबई सत्र न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकाकर्त्यांच्या मागणीनुसार या सर्वांवर आयपीसी कलम 156 (3) अंतर्गत गुन्हा दाखल करून चौकशीची मागणी भारतीय स्त्री शक्ती संघटनेतर्फे सीमा देशपांडे यांनी दाखल केली आहे. तक्रारीबाबत मुंबई पोलिसांनी कोणतीही दखल न घेतल्यानं तक्रारदारांनी कोर्टात याचिका केली आहे.

ट्रेलरमध्ये अनेक लैंगिक दृश्ये, हिंसक दृश्ये आहेत. तसेच या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये अल्पवयीन मुलगा आणि महिलेची आक्षेपार्ह स्थितीतली दृश्यही दाखविली आहेत. यावर राष्ट्रीय महिला आयोगाने आक्षेप घेतला आहे. इतकेच नाही तर याविरोधात केंद्रीय माहिती प्रसारण खात्याकडे तक्रार केली आहे. हा ट्रेलर फेसबुक, यूट्यूब, ट्विटर सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला आहे. सिनेमाचा ट्रेलर पाहिल्यानंतर रेखा शर्मा यांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला पत्र पाठवत ही सर्व दृश्ये सेन्सॉर करण्याची विनंती केली आहे. या सिनेमाचा ट्रेलर सर्वच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसारित करण्यात आला आहे. या ट्रेलरमधून अल्पवयीन मुलांचा समावेश असलेल्या अशा लैंगिक सामग्रीच्या खुल्या प्रसारणाचा निषेध या पत्राद्वारे करण्यात आला आहे.

महिला आयोगाने पत्रात काय म्हटलंय?

'वरण भात लोंचा, कोन नाय कोंचा' या मराठी चित्रपटासंदर्भात भारतीय स्त्री शक्ती, महाराष्ट्राकडून राष्ट्रीय महिला आयोगाला तक्रार प्राप्त झाली आहे. 14 जानेवारीला प्रदर्शित चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अल्पवयीन मुलांवर आक्षेपार्ह पद्धतीने अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

हेही वाचा - जान्हवीने शेअर केला ग्लॅमरस फोटो, खुशीने दिला 'घर सोडण्या'चा सल्ला

चित्रपटाचा ट्रेलर फेसबुक, युट्युब, ट्विटर इत्यादी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दर्शकांसाठी वयाचे कोणतेही बंधन न ठेवता प्रसारित केला गेला आहे आणि म्हणूनच अल्पवयीन मुलांसाठीही तो पाहण्यासाठी उपलब्ध आहे, जे निश्चित नियमापलीकडचं आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अल्पवयीन मुलांसाठी अशी लैंगिक दृश्ये उपलब्ध आहेत, याचा महिला आयोग निषेध करतो. अध्यक्षा श्रीमती रेखा शर्मा यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सचिवांना या प्रकरणात त्वरित हस्तक्षेप करण्यासाठी आणि चित्रपटाचा ट्रेलर आणि लैंगिक दृश्ये सेन्सॉर करण्यासाठी पत्र लिहिले आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लैंगिक दृश्ये उघडपणे प्रसारित होणार नाहीत याची खात्री करण्यास आयोगाने सांगितले आहे. या पत्राची प्रत सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनाही पाठवण्यात आली आहे. आयोगाला या प्रकरणी लवकरात लवकर कारवाई करण्याबाबत कळवावे, असंही पत्राच्या शेवटी महिला आयोगाने अधोरेखीत केलं आहे.

पॉक्सो अंतर्गंत कारवाईची मागणी

या सिनेमाच्याविरोधात पॉक्सो कायद्याअंतर्गंत कारवाई करण्याची विनंती केली आहे. सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांच्याविरोधातही कारवाई केली जावी, अशी मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रीय महिला आयोग, राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने देखील या सिनेमातील अनेक दृश्यांवर आक्षेप घेतला आहे. आयोगाच्या मते केवळ सिनेमानिर्मात्यांवरच नाही तर या सिनेमात काम करणा-या मुलांच्या पालकांवरही कारवाई करण्याची गरज आहे. भारतीय स्त्री शक्ती संघटनेचे वकील प्रकाश सालसिंगीकर यांनी सांगितले की, सिनेमाच्या निर्मात्यांवर पॉक्सो कायद्याअंतर्गंत करावाई करायला हावी. 27 जानेवारी रोजी सेशन कोर्टामध्ये पॉक्सो कायद्याअंतर्गंत खटला दाखल केला आहे.

हेही वाचा - विजय देवरकोंडाच्या 'लायगर'चा सर्वात मोठा 'ओटीटी' करार?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.