ETV Bharat / sitara

शेखर कपूर यांनी सांगितला 'एलिझाबेथ' चित्रपटासाठी केट ब्लँशेटच्या कास्टींगचा किस्सा - शेखर कपूर यांनी दिग्दर्शित केलेल्या एलिझाबेथ

शेखर कपूर यांनी दिग्दर्शित केलेल्या एलिझाबेथ या हॉलिवूड चित्रपटासाठी केट ब्लँशेटला कास्ट करण्यासाठीचा एक किस्सा अलिकडेच शेअर केला होता. दिग्दर्शक म्हणाला की त्यांनी केटला कास्ट करण्यासाठी निर्मात्यांविरूद्ध संघर्ष केला, त्यावेळी ती अज्ञात होती.

Shekhar Kapur
शेखर कपूर
author img

By

Published : Jul 20, 2020, 7:33 PM IST

मुंबई - ज्येष्ठ चित्रपट निर्माते शेखर कपूर यांनी एलिझाबेथ या हॉलिवूड चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटासाठी अभिनेत्री केट ब्लँशेटची निवड शेखर यांनी केली होती. मात्र निर्माता स्टुडिओने याला विरोध केला. कारण त्यावेळी ब्लँशेट ही नवखी कलाकार होती आणि स्टुडिओला स्टार कलाकाराची निवड करायची होती. हा किस्सा सध्या सुरू असलेल्या बॉलिवूडमधील घराणेशाहीच्या वादानंतर कपूर यांनी सांगितला आहे.

"एलिझाबेथ हा माझा पहिला हॉलिवूड चित्रपट होता. मी एलिझाबेथची भूमिका साकारू इच्छित असलेल्या केट ब्लँशेट नावाची एक अज्ञात मुलगी पाहिली होती. माझ्या एजंटने सांगितले की स्टुडिओला एक लोकप्रिय स्टार पाहिजे होती आणि मी एखाद्या अज्ञात अभिनेत्रीचा आग्रह धरला तर ते मलाच बदलतील. मी म्हटलं मी जे मनापासून ठरवलंय तेच घडणार. बाकीचा इतिहास तुम्हाला माहिती आहे," असे शेखर कपूर यांनी ट्विटरवर म्हटले आहे.

एलिझाबेथ या हॉलिवूड चित्रपटातील भूमिकेमुळे ब्लँशेटला जागतिक ख्याती मिळाली, त्यासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून बाफ्टाचा पुरस्कार मिळाला आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री प्रकारात तिला प्रथम ऑस्कर नामांकन मिळालं.

दिग्दर्शक आर. बाल्की यांनी घराणेशाहीच्या चर्चेत बॉलिवूड स्टार किड्सचा बचाव केल्यानंतर शेखर कपूरचे हे ट्विट आले आहे.

हेही वाचा - मानुषी छिल्लर म्हणते.. यामुळे मला बुद्धिबळ खेळायला आवडते

"प्रश्न असा आहे की त्यांचा (स्टार किड्स) अयोग्य किंवा मोठा फायदा आहे का? होय, तेथे अनेक साधक बाधक गोष्टी आहेत. पण मी एक साधा प्रश्न विचारतो: माझ्यासाठी आलिया (भट्ट) किंवा रणबीर (कपूर) यांच्यापेक्षा चांगला अभिनेता शोधून दाखवा, आणि मग चर्चा करा. कदाचित काही उत्कृष्ट कलाकार असलेल्या या काही लोकांवर हे अन्यायकारक आहे, "आर. बाल्की यांनी अलीकडेच एका मुलाखतीत सांगितले होते.

शेखर कपूर यांनी यापूर्वी ट्वीट केले होते: "बाल्की, तुमच्याबद्दल खूप आदर आहे. पण काल ​​रात्री मी 'काइ पो छे' पुन्हा पाहिले. त्यावेळी तीनही तरुण कलाकार नवीन होते आणि प्रत्येकाने आश्चर्यकारक कामगिरी केली."

बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी बाल्कीच्या दृष्टिकोनाचा प्रतिकार केला, ज्यात शेखर कपूर, लेखक-संपादक अपूर्व असरानी, ​​चित्रपट निर्माते ओनीर आणि अभिनेता मानवी गगरू आणि अविनाश तिवारी यांचा समावेश आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.