मुंबई - हृतिक रोशनचा 'काबिल' चित्रपट चीनमध्ये प्रदर्शनासाठी सज्ज झाली आहे. भारताच्या बॉक्स ऑफिसवर तुफान प्रतिसाद मिळवल्यानंतर आता चीनी प्रेक्षकांच्या भेटीसाठी हा चित्रपट सज्ज झाला आहे. त्यासाठी हृतिक चीनला रवाना झाला आहे. येथे त्याने चीनी सुपरस्टार जॅकी चेनची भेट घेतली. या भेटीचे काही फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
हृतिक रोशन सध्या चीनमध्ये या चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. या प्रमोशनमधून वेळ काढून त्याने जॅकी चेन यांची भेट घेतली.
![Hritik Roshan met Jackie chan in china](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/3448172_h2.jpg)
![Hritik Roshan met Jackie chan in china](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/3448172_h1.jpg)
हृतिक रोशन लवकरच 'सुपर-३०' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाची बऱ्याच दिवसापासून चर्चा सुरू आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहिर करण्यात आली आहे. या चित्रपटात तो गणीततज्ञाची भूमिका साकारताना दिसणार आहे.