ETV Bharat / sitara

हृतिक रोशनसोबत वाणी कपूरची हॉट केमेस्ट्री, 'वॉर'चं पहिलं गाणं प्रदर्शित - शिल्पा राव

काही दिवसांपूर्वीच 'वॉर'चा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. आता या चित्रपटातलं पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. 'घुंगरू टूट गये' असे या गाण्याचे बोल आहेत.

हृतिक रोशनसोबत वाणी कपूरच हॉट केमेस्ट्री, 'वॉर'चं पहिलं गाणं प्रदर्शित
author img

By

Published : Sep 5, 2019, 11:34 AM IST

मुंबई - अभिनेता हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांच्या 'वॉर' चित्रपटाची बऱ्याच दिवसापासून चर्चा पाहायला मिळते. या चित्रपटात अभिनेत्री वाणी कपूर ही देखील झळकणार आहे. काही दिवसांपूर्वीच 'वॉर'चा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. आता या चित्रपटातलं पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. 'घुंगरू टुट गये' असे या गाण्याचे बोल आहेत.

'घुंगरू' गाण्यात वाणीचा अत्यंत हॉट अंदाज पाहायला मिळतो. याशिवाय हृतिकसोबतची तिची रोमॅन्टिक केमेस्ट्री देखील चाहत्यांना भुरळ घालते. दोघेही पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. अरिजीत सिंग आणि शिल्पा राव यांनी या गाण्याला आवाज दिला आहे. तर, विशाल आणि शेखरच्या जोडीने या गाण्याला संगीत दिलं आहे.

हेही वाचा-मुंबईत मुसळधार पाऊस, पल पल दिल के पासचं ट्रेलर लॉन्च इव्हेंट ढकललं पुढे

या गाण्याचं शूटिंगही विदेशात झाले आहे. या गाण्यातलं लोकेशन पाहून हृतिक आणि सोनमच्या 'धिरे धिरे से मेरी जिंदगी' या गाण्याचीही आठवण येते.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
'वॉर' चित्रपटात टायगर आणि हृतिक यांची जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. आता दोन अ‌ॅक्शन हिरो एकत्र येणार म्हटल्यावर प्रेक्षकांनाही या चित्रपटाची उत्सुकता आहे. २ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होईल.

हेही वाचा-साहोच्या हिंदी व्हर्जनचं बॉक्स ऑफिसवर शतक

Intro:Body:

ent

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.