सध्या देशात ग्लोबलाझेशनचे वारे वाहत आहेत आणि तरुणाई जागतिक सिनेमे आणि वेब सिरीज पाहायला पसंती देत आहेत. पण सर्वच जण इंग्रजीमध्ये पारंगत नसतात त्यामुळे परदेशी निर्मितीसंस्थांनी आपापले शोज आणि चित्रपट भारताच्या स्थानिक भाषेत डब करून उपलब्ध करून द्यायला सुरुवात केली त्याला भरघोस पाठिंबाही मिळू लागला. आता हेच परदेशी चित्रपट आता मराठीतही उपलब्ध होत असून त्यामुळे त्याला मराठी प्रेक्षक पाठिंबा देतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
भारतात हॅालीवूडपटांचा स्वत:चा असा मोठा चाहता वर्ग आहे. हॅालीवूड चित्रपट असो किंवा सीरिज त्या बघण्याची एक वेगळीच मजा असते. या चाहत्यांसाठी आणि हॅालीवूड चित्रपटप्रेमी रसिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बहुचर्चित एकापेक्षा एक हॅालीवूड चित्रपटांची मेजवानी त्यांना आता घरबसल्या घेता येणार आहे ते सुद्धा चक्क मराठीत!
प्रेक्षकांच्या मनोरंजनाची अचूक नस ओळखून त्यांचे मनोरंजन करण्याची किमया अल्ट्राने चांगलीच साधली आहे. वेगवेगळया संकल्पना व मनोरंजनाचे व्यासपीठ उपलब्ध करुन देत त्यांनी अनेक नानाविध मनोरजंनाचा खजिना आजवर प्रेक्षकांसाठी आणला आहे. आता आपल्या ‘अल्ट्रा हॅालीवूड’ या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्यांनी हॅालीवूडपटांची मेजवानी प्रेक्षकांसाठी आणली आहे.
'अल्ट्राचे विविध फेसबुक पेजेस अत्यंत लोकप्रिय असून, जगभरातील प्रेक्षकांचा याला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक आकर्षक कलाकृतींची रेलचेल 'अल्ट्रा’च्या विविध पेजवर पहायला मिळते. ज्याला आजवर जागतिक स्तरावर चांगले व्ह्यूज मिळाले आहेत. हॅालीवूडपटांची क्रेझ लक्षात घेता हे चित्रपट प्रेक्षकांसाठी अनोखी ट्रीट ठरतील असा विश्वास अल्ट्रा मीडिया आणि एंटरटेनमेंट ग्रुपचे सीईओ, सुशीलकुमार अग्रवाल यांनी व्यक्त केला.
‘अगेंस्ट द वाइल्ड II’, ‘बार्क रेंजर’, ‘ज्युरासिक गॅलेक्सी’, ‘सिजलिंग बेबी पांडा’, ‘रसेल मॅडनेस’, ‘कॉन्ट्रैक्ट टू किल’, ‘द डिफेंडर’, ‘वेक ऑफ़ डेथ’, ‘द स्टोलन प्रिंसेस’, ‘एयर ३’, ‘एयर ४, ‘एयर ५’ यासारखे अनेक गाजलेले हॅालीवूडपट पहायला मिळणार आहेत. अल्ट्राच्या 'हॉलीवूड मराठी' व ‘अल्ट्रा किड्स’ या यूट्यूब चॅनलच्या विभागात मराठीत डब केलेले गाजलेले हॉलीवूड आणि ॲनिमेशन चित्रपट पहाता येणार आहेत.
हेही वाचा - भेटा ‘रात्रीस खेळ चाले ३’मधील नवीन ‘शेवंता’ ला!