मुंबई - या वर्षाच्या सुरुवातीस प्रदर्शित झालेल्या मल्याळम क्राइम थ्रिलर 'अंजम पाथिरा' चा हिंदी रिमेक बनणार आहे. या रिमेकसाठी रिलायन्स एंटरटेनमेंट, आशिक उस्मान प्रॉडक्शन आणि एपी इंटरनॅशनल एकत्र आले आहेत.
या चित्रपटाची निर्मिती आशिक उस्मान यांनी केली आहे. मिधुन मॅन्युअल थॉमस यांनी हा चित्रपट लिहिला असून त्यांनीच याचे दिग्दर्शन केले आहे.
कुंचाको बोबन, शराफ यू धीन, उन्निमाया प्रसाद, जिनू जोसेफ आणि श्रीनाथ भासी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाची तथा सिरीयल किलर भोवती गुंफण्यात आली आहे.
रिलायन्स एंटरटेनमेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिबाशीश सरकार म्हणाले, "अंजाम पाथिरा अशा एक थरारक थ्रिलर्सपैकी एक आहे जो आपल्याला सीटवर बाधून ठेवतो. देश आणि जगभरातील प्रेक्षकांसाठी हा चित्रपट रीमेक करताना आम्हाला आनंद झाला आहे."
आशिक उस्मान प्रॉडक्शनचे मॅनेजिंग पार्टनर आशिक उस्मान म्हणाले की, “या वर्षाचा सर्वात मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट असल्याचे सांगताना मला अभिमान वाटतो.
एपी इंटरनॅशनलचे मॅनेजिंग पार्टनर संजय वाधवा यांनीही रिमेकबद्दल आनंद व्यक्त केला.