ETV Bharat / sitara

'गली बॉय'चा 'शेर' सिद्धांत चतुर्वेदी दुसऱ्या चित्रपटासाठी सज्ज - ranveer singh

सिद्धांतच्या 'गली बॉय'मधील भूमिकेनंतर त्याच्या चाहत्यांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्याच्या अभिनयाचं खुद्द महानायक अमिताभ बच्चन यांनीही कौतुक केलं होतं. आता तो कधी पडद्यावर पुन्हा एकदा पाहायला मिळतो, याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

'गली बॉय'चा 'शेर' सिद्धांत चतुर्वेदी दुसऱ्या चित्रपटासाठी सज्ज
author img

By

Published : Jun 24, 2019, 7:47 AM IST

मुंबई - दिग्दर्शिका झोया अख्तर यांच्या 'गली बॉय' चित्रपटातून अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात त्याने 'एमसी शेर'ची तडफदार भूमिका साकारली होती. रणवीरसोबतच त्याच्या भूमिकेचेही फार कौतुक झाले. नवोदीत असुनही त्याने साकारलेल्या भूमिकेची प्रेक्षकांवर छाप पडली. त्यामुळे 'गली बॉय'नंतर तो पुन्हा कोणत्या चित्रपटात दिसणार याची प्रेक्षकांना उत्सुकता होती.

सिद्धांतने अलिकडेच त्याच्या आगामी चित्रपटांबद्दल माहिती दिली आहे. एका माध्यमाशी बोलताना त्याने सांगितले, की 'माझ्या हातात सध्या दोन प्रोजेक्ट्स आहेत. त्यापैकी एक अॅक्शन चित्रपट राहणार आहे. त्यासाठी मी प्रशिक्षणही घेत आहे. तर, दुसरा चित्रपट हा विनोदी भूमिकेचा असेल'.

काही दिवसांपर्वीच झोया अख्तर या 'गली बॉय'चा सिक्वेल बनवणार असल्याच्या चर्चा होत्या. त्याबद्दल बोलताना सिद्धांत म्हणाला की, दिल्लीच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट आधारित असेल. झोया या चित्रपटाच्या कथानकावर काम करत आहेत'.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.