मुंबई - बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आणि त्याची पत्नी आणि इंटेरिअर डिझायनर असलेली गौरी खान यांची जोडी आज चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. त्यांची प्रेमकथा देखील एखाद्या चित्रपटाला साजेशी अशीच आहे. गौरीला मिळवण्यासाठी शाहरुखने बरीच मेहनत घेतली होती. आज गौरीचा वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात हे काही खास किस्से...
गौरीचा जन्म ८ ऑक्टोबर १९७० साली दिल्लीमध्ये झाला होता. जेव्हा शाहरुखने गौरीला पहिल्यांदा पाहिले होते, तेव्हा ती केवळ १४ वर्षांची होती. पहिल्याच नजरेत शाहरुखला तिच्यावर प्रेम झालं होतं. मात्र, गौरीसमोर प्रेमाची कबुली देण्यासाठी तो नर्व्हस व्हायचा. तीनवेळा गौरीला भेटल्यानंतर शाहरुख तिचा नंबर घेऊ शकला. होता.
हेही वाचा -२ नोव्हेंबरला शाहरुख खान पुन्हा परततोय छोट्या पडद्यावर
अशी होती पहिली भेट -
शाहरुख आणि गौरी २५ ऑक्टोबर १९८४ ला दिल्लीच्या पंचशील एनक्लेव्हच्या पंचशील क्लबमध्ये पहिल्यांदा भेटले होते. बऱ्याच माध्यमांमध्ये त्यांच्या या डेटविषयी छापण्यात आलं आहे. त्यांची पहिली डेट अवघ्या ५ मिनिटांची होती. आज रोमान्सचा बादशाह मानला जाणारा शाहरुख गौरीसमोर मात्र, पहिल्यांदा प्रेमाची कबुली देताना अडखळला होता.
त्यानंतर दोघंही जेएनयू कॅम्पसमध्ये एकमेकांना भेटत असत. शाहरुख तिच्यासाठी इतिहासाच्या नोट्स बनवून तिला देत असे. गौरीदेखील त्याच्यासाठी मेहनत घेत होती. शाहरुखच्या 'बाजीगर' चित्रपटातील त्याच्या एका गाण्यासाठी गौरीनेच त्याचे कपडे डिझाईन केले होते.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
आज दोघांचीही जोडी कपल गोल मानली जाते. त्यांना सुहाना, आर्यन आणि अबराम अशी मुलेही आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हेही वाचा -शाहरुखच्या चाहत्यांसाठी खुशखबर! लवकरच करणार चित्रपटाची घोषणा