ETV Bharat / sitara

‘विजेता’मध्ये सुबोध भावेंसोबत स्क्रीन शेअर करणं स्वप्नवत - गौरीश शिपुरकर - विजेतामध्ये सुबोध भावेंसोबत गौरीश शिपुरकर

तगडी स्टारकास्ट असलेला ‘विजेता’ हा चित्रपट पुनःप्रदर्शित होण्यास सज्ज झालाय. सुप्रसिद्ध ‘शोमॅन’ सुभाष घई प्रस्तुत ‘विजेता’ रिलीज झाल्याच्या दुसऱ्याच दिवसापासून लॉकडाऊन लागला होता त्यामुळे तो पुनःप्रदर्शित होत आहे. या चित्रपटात अनेक नवीन जुने कलाकार असून अनेक नाटकांमधून नावारूपाला आलेला अभिनेता गौरीश शिपुरकर आता 'विजेता' सिनेमामधून रूपेरी पडद्यावर पदार्पण करतोय. अभिनेता गौरीश शिपुरकरने नुकताच सुबोध भावे यांच्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

‘विजेता’ हा चित्रपट पुनःप्रदर्शित होण्यास सज्ज

author img

By

Published : Nov 30, 2021, 10:52 PM IST

सुबोध भावे, पूजा सावंत, सुशांत शेलार, माधव देवचके, प्रीतम कागणे अशी तगडी स्टारकास्ट असलेला ‘विजेता’ हा चित्रपट पुनःप्रदर्शित होण्यास सज्ज झालाय. सुप्रसिद्ध ‘शोमॅन’ सुभाष घई प्रस्तुत ‘विजेता’ रिलीज झाल्याच्या दुसऱ्याच दिवसापासून लॉकडाऊन लागला होता त्यामुळे तो पुनःप्रदर्शित होत आहे. या चित्रपटात अनेक नवीन जुने कलाकार असून अनेक नाटकांमधून नावारूपाला आलेला अभिनेता गौरीश शिपुरकर आता 'विजेता' सिनेमामधून रूपेरी पडद्यावर पदार्पण करतोय. अभिनेता गौरीश शिपुरकरने नुकताच सुबोध भावे यांच्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

अभिनेता गौरीश शिपुरकर विजेता सिनेमाविषयी म्हणाला की, ‘कोरोना महामारीमुळे विजेता सिनेमाचे पुन:प्रदर्शन करण्यात येत आहे. हा माझा पहिलाच सिनेमा आहे. शिवाय या सिनेमातील सगळेच कलाकार खूप अनुभवी आहेत. सुबोध भावे, पूजा सावंत, माधव देवचके, सुशांत शेलार यांच्यासोबतचे सेटवरचे अनुभव खूप स्पेशल आहेत." सुबोध भावे यांच्यासोबतचा एक किस्सा शेअर करताना तो म्हणाला, “‘विजेता’ सिनेमात सुबोध भावे सरांसोबत काम करण्याची संधी मिळणं हेच माझ्यासाठी खूप खास आहे. ज्यांना तुम्ही लहानपणापासून रंगमंच ते रूपेरी पडद्यावर पाहिल, ज्यांची नाटकं आणि सिनेमे बघून तुम्ही मोठे झालात, त्यांच्यासोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळणं हे माझ्यासाठी स्वप्नवत आहे. शिवाय विजेता सिनेमाच्या सेटवर त्यांचा अभिनय जवळून अनुभवता येणं ही माझ्यासाठी पर्वणी होती.”

तो पुढे म्हणाला, "’विजेता’ सिनेमात माझा आणि सुबोध सरांचा एक सोलो सीन आहे. त्यामध्ये मी आणि सुबोध सर आहोत. माझे डायलॉग पाठ होते. पण त्यांच्यासमोर सीन करताना माझे शब्दच फुटत नव्हते. सरांचा अभिनय पाहून मी आजवर शिकत आलो आणि आता त्यांच्यासमोर डायलॉग बोलताना मनात धाकधूक होत होती. मी त्यांना जेव्हा जेव्हा सीनबद्दल विचारत होतो त्यावेळेस त्यांनी प्रत्येक गोष्ट समजावून सांगितली. त्यामुळे हा सुंदर किस्सा माझ्या कायम स्मरणात राहील."

हेही वाचा - 'मे डे' चित्रपटाचे शीर्षक बदलून ‘रनवे ३४’ करण्यामागचे अजय देवगणने सांगितले कारण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.