मुंबई - लेखक, दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे यांच्या बहुप्रतीक्षित ‘सरसेनापती हंबीरराव’ची चर्चा सर्वत्र सुरू आहे. या चित्रपटात मराठीतील हॅंड्सम हंक अभिनेता गश्मीर महाजनी चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.
![सरसेनापती हंबीरराव](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-ent-gashmir-mahajani-chhatrapati-shivaji-sarsenapati-hambirrao-mhc10001_20022021002611_2002f_1613760971_112.jpeg)
प्रविण विठ्ठल तरडे यांच्या ‘मुळशी पॅटर्न’ या संवेदनशील, सामाजिक चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकत बॉक्सऑफिसवर दणदणीत यश संपादन केले. यामुळे प्रविण विठ्ठल तरडे यांनी ‘सरसेनापती हंबीरराव’ या ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा केल्यापासून महाराष्ट्रासह जगभरातील चाहते या ऐतिहासिक चित्रपटाची मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत आहेत.
हेही वाचा - आजपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफी स्पर्धा, 'स्टार' खेळाडूंकडे असणार लक्ष
उर्वीता प्रॉडक्शन्स निर्मित, शेखर मोहिते पाटील, सौजन्य सुर्यकांतराव निकम, धर्मेंद्र सुभाष बोरा यांची निर्मिती असलेल्या ‘सरसेनापती हंबीरराव’ हा ऐतिहासिक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल.