ETV Bharat / sitara

गश्मीर महाजनी - पूजा सावंतची कोळीवाड्यात धमाल बाईक राईड, पाहा व्हिडिओ - mic de rap song from Bonas film

गश्मीर महाजनी आणि पूजा सावंत दोघेही 'बोनस' चित्रपटात एकत्र भूमिका साकारणार आहेत.

Bonas Marathi film, Gashmir Mahajani Bike Ride with Pooja Sawant, गश्मीर महाजनी - पूजा सावंतची कोळीवाड्यात बाईक राईड, बोनस चित्रपट, Bonas Marathi film first look, Bonas Marathi film news, Bonas film rap song, mic de rap song from Bonas film, Pooja Sawant look in Bonas Marathi film
गश्मीर महाजनी - पूजा सावंतची कोळीवाड्यात धमाल बाईक राईड, पाहा व्हिडिओ
author img

By

Published : Feb 2, 2020, 5:36 PM IST

मुंबई - मराठी सिनेसृष्टीतला हँडसम हंक गश्मीर महाजनी आणि अभिनेत्री पूजा सावंत दोघेही लवकरच 'बोनस' चित्रपटात एकत्र झळकणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने दोघेही पहिल्यांदाच एकमेकांसोबत भूमिका साकारताना दिसणार आहेत. पूजा सावंत यामध्ये कोळीण दाखवली आहे. त्यामुळे गश्मीर महाजनी आणि पूजाने कोळीवाड्यात धमाल बाईक राईड केली आहे. गश्मीरने त्यांच्या बाईक राईडचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

'बोनस' हा एका अशा मुलाचा आनंदप्रवास आहे की आपल्या वाट्याचे चांगले प्रसंग जगाबरोबर शेअर करताना त्याचे आयुष्य बदलून जाते आणि त्याच्या धारणाही संपूर्णपणे बदलून जातात. यामध्ये पूजा सावंत ही गश्मीरच्या प्रेयसीच्या भूमिकेत दिसणार आहे. तिचा फर्स्ट लुकही काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला आहे.

हेही वाचा -'व्हॅलेंटाईन डे'ला शिव - वीणा चाहत्यांना देणार खास सरप्राईझ, पाहा झलक

गश्मीरनेही या चित्रपटातील शूटिंगदरम्यानचा एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये या चित्रपटातील रॅप गाणं 'माईक दे'ची झलक पाहायला मिळते.

‘लायन क्राऊन एंटरटेन्मेंट’ आणि अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाची गोविंद उभे, अनुपमा कराळे, कांचन पाटील व जीसिम्स यांच्याअंतर्गत निर्मिती करण्यात आली आहे.

हेही वाचा -सारा-कार्तिकचे चाहत्यांसाठी नवे चॅलेंज, व्हायरल होतोय व्हिडिओ

सौरभ भावे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ‘बोनस’ हा चित्रपट येत्या २८ फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

Intro:Body:

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.