ETV Bharat / sitara

गश्मिर आणि पूजा सावंतच्या 'बोनस'चे मुख्य पोस्टर रिलीज - GashmeerMahajani latest news

मराठी सिनेसृष्टीतला 'हँडसम हंक' गश्मीर महाजनी आणि अभिनेत्री पूजा सावंत दोघेही लवकरच 'बोनस' चित्रपटात एकत्र झळकणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने दोघेही पहिल्यांदाच एकमेकांसोबत भूमिका साकारताना दिसणार आहेत. 'बोनस'चे मुख्य पोस्टर रिलीज झाले आहे.

Main poster of Marathi film Bonus release
गश्मिर आणि पूजा सावंत
author img

By

Published : Feb 11, 2020, 7:23 PM IST

अभिनेता गश्मिर महाजनी आणि पूजा सावंत यांच्या आगामी 'बोनस' या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने दोघेही पहिल्यांदाच एकमेकांसोबत भूमिका साकारताना दिसणार आहेत. मुंबईच्या लोकेशनच्या पार्श्वभूमीवर गश्मिर आणि पूजा आत्मविश्वासाने चालताना पोस्टरवर दिसतात. 'छोट्या क्षणांची बंपर धम्माल' अशी या पोस्टरची टॅगलाईन आहे.

‘लायन क्राऊन एंटरटेन्मेंट’ आणि अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार यांची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाची गोविंद उभे, अनुपमा कराळे, कांचन पाटील व जीसिम्स यांच्याअंतर्गत निर्मिती करण्यात आली आहे.

'बोनस' हा एका अशा मुलाचा आनंदप्रवास आहे की आपल्या वाट्याचे चांगले प्रसंग जगाबरोबर शेअर करताना त्याचे आयुष्य बदलून जाते आणि त्याच्या धारणाही संपूर्णपणे बदलून जातात. यामध्ये पूजा सावंत ही गश्मीरच्या प्रेयसीच्या भूमिकेत दिसणार आहे. तिचा फर्स्ट लुकही काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला आहे.

'बोनस' चित्रपटाचे दिग्दर्शन सौरभ भावे यांनी केलंय. या चित्रपटाची कथाही सौरभ यांनीच लिहिली आहे. २८ फेब्रुवारी २०२० ला हा चित्रपट थिएटर्समध्ये दाखल होणार आहे.

Intro:Body:

ent news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.