ETV Bharat / sitara

५२व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2021मध्ये ‘फनरल’ची निवड! - फनरल मराठी मुव्ही

सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचा विषय ‘फनरल’ या चित्रपटात मांडण्यात आला आहे. सद्यस्थितीला धरून असलेला हा विषय प्रत्येकाला अंतर्मुख करेल, असे निर्माते व लेखक रमेश दिघे सांगतात. निर्माते व लेखक रमेश दिघे व दिग्दर्शक विवेक दुबे या जोडीने सिनेसृष्टीची कोणतीही पार्श्वभूमी नसताना एक छान सामाजिक कथा ‘फनरल’ चित्रपटाच्या स्वरूपात मांडली व त्याच ‘फनरल’ चित्रपटाचे आज राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक होताना दिसत आहे.

फनरल मराठी मुव्ही
फनरल मराठी मुव्ही
author img

By

Published : Nov 13, 2021, 10:19 AM IST

Updated : Nov 13, 2021, 10:35 AM IST

गोव्यात होऊ घातलेल्या ५२व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) २०२१साठी चित्रपटांची अधिकृत निवड जाहीर करण्यात आली आहे. मराठीतील एकूण सहा चित्रपटांचा समावेश असून ‘फनरल’ या मराठी चित्रपटाने स्थान पटकावले आहे. अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय महोत्सवामध्ये गौरविल्या गेलेल्या ‘फनरल’ या मराठी चित्रपटाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. या आगामी मराठी चित्रपटाची नामांकित ‘इफ्फी’ महोत्सवातही वर्णी लागली आहे.

सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचा विषय ‘फनरल’ या चित्रपटात मांडण्यात आला आहे. सद्यस्थितीला धरून असलेला हा विषय प्रत्येकाला अंतर्मुख करेल, असे निर्माते व लेखक रमेश दिघे सांगतात. आपल्या रोजच्या जगण्यातील भाव-भावनांचे प्रतिबिंब चित्रपटात उमटले पाहिजे, हाच विचार करून सर्वसामान्यांच्या जीवनाला भिडणारा विषय ‘फनरल’ चित्रपटात मांडल्याचे दिग्दर्शक विवेक दुबे सांगतात. याआधी पुणे आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सव, अंबरनाथ महोत्सव, राजस्थान चित्रपट महोत्सव या महोत्सवांमध्ये ‘फनरल’ चित्रपटाची निवड झाली होती. यातील अंबरनाथ व राजस्थान चित्रपट महोत्सवात चित्रपटाने अनेक पुरस्कार पटकावले आहेत.

निर्माते व लेखक रमेश दिघे व दिग्दर्शक विवेक दुबे या जोडीने सिनेसृष्टीची कोणतीही पार्श्वभूमी नसताना एक छान सामाजिक कथा ‘फनरल’ चित्रपटाच्या स्वरूपात मांडली व त्याच ‘फनरल’ चित्रपटाचे आज राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक होताना दिसत आहे. चित्रपटात आरोह वेलणकर, विजय केंकरे, प्रेमा साखरदांडे, संभाजी भगत आदींच्या भूमिका आहेत.

Last Updated : Nov 13, 2021, 10:35 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.