ETV Bharat / sitara

विक्रमी कमाई करणाऱ्या ‘टकाटक’ नंतर आता येतोय ‘टकाटक २’! - ‘टकाटक’ चित्रपटाचा सिक्वेल

२०१९ मध्ये टकाटक हा चित्रपट सर्वात जास्त कमाई करणारा मराठी चित्रपट ठरला. हाच बॉक्स ऑफिसवर तूफान गाजलेला ला ‘टकाटक’ आता सिक्वेलच्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘टकाटक’च्या यशानंतर आता येणार आहे ‘टकाटक २’. पर्पल बुल एंटरटेनमेंट प्रा. लि.च्या बॅनरखाली निर्माते ओमप्रकाश भट्ट आणि धनजंय सिंग मासूम तसेच सहनिर्माते जगत सिंग यांनी ‘टकाटक २’ ची अधिकृत घोषणा केली आहे.

Official announcement of 'Takatak 2'
‘टकाटक २’ ची अधिकृत घोषणा
author img

By

Published : Apr 10, 2021, 3:12 PM IST

मराठी चित्रपटसृष्टीत बॉक्स ऑफिसवर कमाई होत नाही म्हणून ओरड होत असताना संपूर्ण नवीन टीम असलेला ‘टकटक’ या चित्रपटाने मस्त गल्ला जमविला. २०१९ चा तो सर्वात जास्त कमाई करणारा मराठी चित्रपट ठरला. हाच बॉक्स ऑफिसवर तूफान गाजलेला आणि परिक्षकांनी कौतुकाचा वर्षाव केलेला ‘टकाटक’ आता सिक्वेलच्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘टकाटक’च्या यशानंतर आता येणार आहे ‘टकाटक २’. पर्पल बुल एंटरटेनमेंट प्रा. लि.च्या बॅनरखाली निर्माते ओमप्रकाश भट्ट आणि धनजंय सिंग मासूम तसेच सहनिर्माते जगत सिंग यांनी ‘टकाटक २’ ची अधिकृत घोषणा केली आहे.

मिलिंद कवडेंच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या ‘टकाटक’ने विक्रमी व्यवसाय करत २०१९ च्या पूर्वार्धाच्या अखेरीस मराठी सिनेसृष्टीत नवचैतन्य निर्माण केलं होतं. लॉकडॉऊनच्या पार्श्वभूमीवर आता ‘टकाटक २’ ची घोषणा करण्यात आल्याने सिनेसृष्टीत पुन्हा एकदा उत्साहाचं वातावरण पसरलं आहे. दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनीच ‘टकाटक २’ ची कथा आणि पटकथा लिहिली असून संवाद किरण बेरड यांचे आहेत. गीतकार जय अत्रे यांच्या लेखणीतून साकारलेल्या गीतांना संगीतकार वरूण लिखते संगीतबद्ध करणार असून हजरत शेख वली या चित्रपटाचे कॅमेरामन आहेत. ‘टकाटक २’ मधील कलाकारांची नावे सध्या तरी गुलदस्त्यातच ठेवण्यात आली आहेत.

‘टकाटक’ला मिळालेल्या यशानंतर पुढील भाग बनवताना जबाबदारी आणखी वाढली आहे. पुन्हा एकदा प्रेक्षकांना रूचेल, पटेल, भावेल असं काहीतरी नावीन्यपूर्ण देण्याचा प्रयत्न आहे, जो त्यांना नक्कीच आवडेल अशी खात्री मिलिंद कवडे यांनी व्यक्त केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘टकाटक २’ चं मोशन पोस्टर लाँच करण्यात आलं. ‘टकाटक’ची कथा तरूणाईवर आधारित होती. यासोबतच या चित्रपटात एक सशक्त मेसेजही दडला होता, त्यामुळे ‘टकाटक २’ या चित्रपटात नेमकं काय पहायला मिळेल याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

​‘टकाटक’ या चित्रपटावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केल्याने ‘टकाटक २’ च्या रूपात पुढील भाग आणण्याची कल्पना सुचल्याचं दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनी सांगितले. ‘टकाटक २’ मध्ये प्रेक्षकांना सुमधूर गीत-संगीताने सजलेली एक फ्रेश प्रेमकथा पहायला मिळणार आहे.

हेही वाचा - आमिर खानची मुलगी इरा करतेय मराठमोळ्या नुपुर शिखरेशी डेटिंग

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.