ETV Bharat / sitara

तमाशाच्या फडातील 'चंद्रमुखी' महाराष्ट्रातील रसिकांना वेड लावण्यासाठी होतेय सज्ज

author img

By

Published : Jan 14, 2020, 7:00 PM IST

'चंद्रमुखी' या आगामी चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले आहे. याचे दिग्दर्शन प्रसाद ओक करीत आहेत. नटरंग सिनेमानंतर आता पुन्हा एकदा अजय- अतुल यांचे संगीत लावणीला लाभणार आहे.

Chandramukhi
चंद्रमुखी'

मुंबई - मराठी सिनेमात तमाशाचा विषय खूप आधीपासून रंगवला गेलाय. जुने मराठी चित्रपट तर तमाशापट म्हणूनही ओळखले जायचे. अलिकडे 'नटरंग' या चित्रपटाने त्याला पुन्हा बहर आणला होता. यातील अजय- अतुल यांनी संगीतबध्द केलेली गाणे प्रचंड लोकप्रिय झाली होती. आता पुन्हा एकदा अजय- अतुल यांचे संगीत लावणीला लाभणार आहे. 'चंद्रमुखी' असे या चित्रपटाचे शीर्षक असेल.

'चंद्रमुखी' या आगामी चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले आहे. अक्षय विलास बर्दापूर यांची निर्मिती असलेल्या 'चंद्रमुखी'चे दिग्दर्शन प्रसाद ओक करीत आहेत. प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेशो यांची ही निर्मिती आहे.

मराठीतील नामवंत कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या 'चंद्रमुखी' या कादंबरीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे. राजकारणी नेते आणि तमाशा बारीचा यात विषय हाताळण्यात आलाय. या चित्रपटात कोण कलाकार काम करीत आहेत हे अद्याप गुलदस्त्यात आहे. चिन्मय मांडलेकर या सिनेमाची पटकथा आणि संवाद लिहिणार आहेत.

Intro:Body:

ent marathi

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.