ETV Bharat / sitara

सत्य घटनेवर आधारित 'बंदीशाळा' सिनेमाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित - release date

मुक्ता बर्वेच्या बंदीशाला सिनेमाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित झालं आहे. एका सत्य घटनेवर आधारित असलेल्या या चित्रपटाची कथा संजय कृष्णाजी पाटील यांनी लिहिली असून पहिल्यांदाच त्यांनी कादंबरी बाहेरील विषयाला हात घातला आहे.

'बंदीशाळा' सिनेमाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित
author img

By

Published : May 16, 2019, 8:05 AM IST

मुंबई - 'जोगवा', 'पांगिरा',' ७२ मैल एक प्रवास', या गाजलेल्या दर्जेदार चित्रपटांचे लेखक प्रस्तुतकर्ते आणि 'दशक्रिया' या चित्रपटाच्या पटकथा लेखनासाठी राष्ट्रीय पुरस्काराने गौरवलेले संजय कृष्णाजी पाटील यांचा नवा चित्रपट ‘बंदिशाळा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. एका सत्य घटनेवर आधारित असलेल्या या चित्रपटाची कथाही संजय कृष्णाजी पाटील यांनी लिहिली असून पहिल्यांदाच त्यांनी कादंबरी बाहेरील विषयाला हात घातला आहे.

या चित्रपटाची रिलीजपूर्वीच महाराष्ट्र राज्य सरकारच्यावतीने कान्ससाठी निवड झाली असून ५६ व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारांमध्ये या चित्रपटाला सर्वोत्कृष्ठ कलादिग्दर्शनाच्या घोषित पुरस्कारासह ६ विभागांमध्ये नामांकने मिळाली आहेत. ‘बंदिशाळा’मध्ये अभिनेत्री मुक्ता बर्वे ही मुख्य भूमिकेत आहे. हा एक सामाजिक चित्रपट असून त्याला एका कारागृहाची पार्श्वभूमी लाभली आहे. एका कर्तव्यदक्ष महिला तुरुंग अधिकार्‍याची कथा या चित्रपटातून उलगडणार आहे. मुक्ताने या चित्रपटात माधवी सावंत या महिला तुरुंग अधिकाऱ्याची भूमिका केली असून ही आजवरची आपल्या कारकिर्दीतील सर्वात आव्हानात्मक भूमिका असल्याचं तिने म्हटलं आहे.

mukta barve, bandishala
'बंदीशाळा' सिनेमाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित

मुक्ताशिवाय या चित्रपटात विक्रम गायकवाड, शरद पोंक्षे, हेमंगी कवी, सविता प्रभुणे, आशा शेलार, प्रवीण तरडे, अश्विनी गिरी, अजय पुरकर, माधव अभ्यंकर, शिवराज वाळवेकर, आनंद आलकुंटे, अभिजीत झुंजारराव, आनंदा कार्येकर, प्रसन्न केतकर, वर्षा घाटपांडे, सोनाली मगर, प्रताप कळके आणि राहुल शिरसाट यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण पुणे शहर, पुणे ग्रामीण, भोर तालुका, मुंबई अशा ठिकाणी करण्यात आले आहे. येत्या २१ जूनला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Intro:'जोगवा', 'पांगिरा', '७२ मैल एक प्रवास' या गाजलेल्या दर्जेदार चित्रपटांचे लेखक प्रस्तुतकर्ते आणि 'दशक्रिया' या चित्रपटाच्या पटकथा लेखनासाठी राष्ट्रीय पुरस्काराने गौरवलेले संजय कृष्णाजी पाटील त्यांचा नवा चित्रपट ‘बंदिशाळा’ लवकरच आपल्या भेटीला घेऊन येत आहेत. एका सत्य घटनेवर आधारित असलेल्या या चित्रपटाची कथाही संजय कृष्णाजी पाटील यांनी लिहिली असून पहिल्यांदाच त्यांनी कादंबरी बाहेरील विषयाला हात घातला आहे.

रिलीजपूर्वीच या चित्रपटाची महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने कान्ससाठी निवड झाली असून ५६ व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ठ कलादिग्दर्शनाच्या घोषित पुरस्कारासह ६ विभागांमध्ये नामांकने मिळाली आहेत.

‘बंदिशाळा’मध्ये अभिनेत्री मुक्ता बर्वे ही मुख्य भूमिकेत आहे. हा एक सामाजिक महत्वाकांशी चित्रपट असून त्याला एका कारागृहाची पार्श्वभूमी लाभली आहे. एका कर्तव्यदक्ष महिला तुरुंग अधिकार्‍याची कथा या चित्रपटातून उलगडणार आहे. मुक्ताने या चित्रपटात माधवी सावंत ही महिला तुरुंग अधिकाऱ्याची भूमिका केली असून ती आजवरची आपल्या कारकिर्दीतील सर्वात आव्हानात्मक भूमिका असल्याचं तिने सांगितलं आहे.
मुक्ता शिवाय विक्रम गायकवाड, शरद पोंक्षे, हेमंगी कवी, सविता प्रभुणे, अशा शेलार, प्रवीण तरडे, अश्विनी गिरी, अजय पुरकर,माधव अभ्यंकर, शिवराज वाळवेकर, आनंद आलकुंटे, अभिजीत झुंजारराव, आनंदा कार्येकर, प्रसन्न केतकर, वर्षा घाटपांडे, सोनाली मगर, प्रताप कळके, राहुल शिरसाट, पंकज चेंबूरकर, लक्ष्मीकांत धोंड, अनिल राबाडे, उमेश बोलके, अनिल नगरकर आणि उमेश जगताप यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण, पुणे शहर, पुणे ग्रामीण, भोर तालुका, मुंबई अश्या ठिकाणी करण्यात आले आहे. येत्या २१ जून २०१९ रोजी हा सिनेमा रिलीज होतोय.
Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.