मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू आणि भूमी पेडणेकर लवकरच पडद्यावर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. 'सांड की आँख' असे या चित्रपटाचे शीर्षक असणार आहे. या चित्रपटाच्या सेटवरील पहिला फोटो आता समोर आला आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी हा फोटो शेअर केला आहे.
जगातील एका वयस्कर शार्पशूटर महिलेवर या चित्रपटाची कथा आधारित असणार असून तापसी चित्रपटात या महिलेची भूमिका साकारणार आहे. त्यामुळे याच्या चित्रीकरणासाठी तापसी आणि भूमी एका छोट्याशा गावात गेल्या आहेत. चित्रपटाचा बहुतेक भाग याच गावात शूट होणार असल्याचे म्हटले जात आहे.
From the sets of #SaandKiAankh... Stars Taapsee Pannu, Bhumi Pednekar, Vineet Singh and Prakash Jha... Directed by Tushar Hiranandani... Produced by Reliance Entertainment, Anurag Kashyap and Nidhi Parmar. pic.twitter.com/nwnAhUTmWK
— taran adarsh (@taran_adarsh) March 11, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">From the sets of #SaandKiAankh... Stars Taapsee Pannu, Bhumi Pednekar, Vineet Singh and Prakash Jha... Directed by Tushar Hiranandani... Produced by Reliance Entertainment, Anurag Kashyap and Nidhi Parmar. pic.twitter.com/nwnAhUTmWK
— taran adarsh (@taran_adarsh) March 11, 2019From the sets of #SaandKiAankh... Stars Taapsee Pannu, Bhumi Pednekar, Vineet Singh and Prakash Jha... Directed by Tushar Hiranandani... Produced by Reliance Entertainment, Anurag Kashyap and Nidhi Parmar. pic.twitter.com/nwnAhUTmWK
— taran adarsh (@taran_adarsh) March 11, 2019
या फोटोत तापसी आणि भूमीची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळते खरी पण ती पाठमोरीच. त्यांचा नेमका लूक या फोटोत समजू शकत नाही. मात्र, पारंपारिक वेशभूषेत असलेल्या या दोघीही चित्रपटासाठी चांगलीच मेहनत घेत असल्याचं या फोटोतून दिसत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि कथा तुषार हिरानंदानी यांची असणार असून अनुराग कश्यप आणि निधी परमार याची निर्मिती करणार आहेत.