ETV Bharat / sitara

‘आरएसव्हीपी‘ च्या आगामी ‘डीसपॅच’ मध्ये शीर्षक भूमिकेत पद्मश्री मनोज बाजपेयी! - film Dispatch news

रॉनी स्क्रूवाला यांची निर्मितीसंस्था ‘आरएसव्हीपी‘ ने गेल्या काही महिन्यांत अनेक चित्रपटांची घोषणा केली. नेहमी चोखंदळ संहितांवर काम करणारे स्क्रूवाला यांनी अजून एका नव्या चित्रपटाचं घोषणा केली आहे,

डीसपॅच चित्रपट
डीसपॅच चित्रपट
author img

By

Published : Jan 30, 2021, 5:32 AM IST

मुंबई - रॉनी स्क्रूवाला यांची निर्मितीसंस्था ‘आरएसव्हीपी‘ ने गेल्या काही महिन्यांत अनेक चित्रपटांची घोषणा केली. नेहमी चोखंदळ संहितांवर काम करणारे स्क्रूवाला यांनी अजून एका नव्या चित्रपटाचं घोषणा केली आहे, ज्याचे नाव आहे ‘डीसपॅच‘ जो डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. पद्मश्री व अत्यंत गुणवान अभिनेता मनोज बाजपेयी यात शीर्षक भूमिका वठविणार असून याचा विषय गुन्हेगारी व जर्नालिझम यांच्यातील परस्परविरोधी कार्याबद्दल आहे. मनोज चे पात्र या दोन्हींच्या विळख्यात भरडले जाणारे असून तो बिझनेस हाऊस व गुन्हेगारी विश्व यात फ़सताना दिसेल.

रॉनी स्क्रूवाला यांनी अजून एका प्रतिभावान व्यक्तीची निवड या चित्रपटासाठी केलीय, कानू बहल, जे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. कानू बहल यांनी ‘तितली’ या चित्रपटातून दिग्दर्शकीय पदार्पण केले, ज्याचा प्रीमियर बहूप्रतिष्ठित कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झाला होता व अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांवर मोहोर उमटवली होती. कानू बहल यांनी दोन वेळा अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा अभिनेता, पद्मश्री मनोज बाजपेयी, सोबत हातमिळवणी केली आहे म्हणजे एक जबरदस्त चित्रपट बनणार यात शंकाच नाही.

निर्माता रॉनी स्क्रूवाला म्हणाले, “नवीन प्लॅटफॉर्मवर आणि विकसित झालेल्या प्रेक्षकांच्या अभिरुचीनुसार आता ‘आऊट ऑफ या बॉक्स’ कथा सांगण्याची संधी अतुलनीय आहे. आरएसव्हीपीमध्ये आमची स्वतःची स्क्रिप्ट्स आणि पटकथा विकसित करण्यावर आणि कथाकथनाची दृष्टी असलेल्या दिग्दर्शकांबरोबर काम करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. चकित करणारे कथानक असलेल्या ‘डीसपॅच‘ व अप्रतिम अभिनयक्षमतेचा कलाकार मनोज बाजपेयी आणि उमदा दिग्दर्शक ज्याच्याकडे अद्वितीय दृष्टिकोन आहे अशा कॉम्बिनेशनमुळे प्रेक्षकांना हा चित्रपट वेगळाच अनुभव देऊन जाईल यावर माझा विश्वास आहे.”

दिग्दर्शक कानू बहल म्हणाले की, “बऱ्याच काळापासून मला ‘डीसपॅच’ ची कथा चित्रबंधित करायची होती. हा काळ चित्रपटसृष्टीसाठी सुगीचा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण सध्या अनेक वैविधीक चित्रपट बनताहेत व माझ्या चित्रपटाला हे वातावरण पोषक आहे. मनोज बाजपेयी आणि रॉनी स्क्रूवाला यांच्याबरोबर ‘सिनेमॅटिक बाउंड्रीज’ ओलांडण्यासाठी प्रयत्न करणं खूप रोमांचक आहे आणि मी या वाटचालीसाठी उत्सुक आहे.”

प्रशंसित अभिनेता मनोज बाजपेयी म्हणाले की, “एक अभिनेता म्हणून मला सांगाव्याशा वाटणाऱ्या कथांमधून मला काम करायचे आहे आणि ‘डीसपॅच‘ ही तशी कथा आहे. हा चित्रपट डिजिटल माध्यमावर प्रदर्शित करण्याचं कारण म्हणजे जगभरातील प्रेक्षक या चित्रपटाचा आनंद लुटू शकतील. ही ‘आजची’ कथा आहे. मी बदलत्या काळाशी जुळवून घेण्यात निपुण असलेल्या कानू बहल यांच्याशी सहकार्य करण्यास उत्सुक आहे आणि कथाकथनाच्या कलाकुसरीवर त्यांचे संपूर्ण नियंत्रण असते त्यामुळे मला काम करायलाही सोपे जाईल.”

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.