ETV Bharat / sitara

जळगावात रंगला 'द ब्युफा पॅजंट फॅशन शो', डिंपल नारखेडे ठरली किताबाची मानकरी

या फॅशन शोमध्ये ५५ मॉडेल्सने वेगवेगळ्या ६ थिम्सवर रॅमवॉक करत आपला जलवा दाखवला.

author img

By

Published : Dec 29, 2019, 5:08 PM IST

Fashion Show organised in Jalgon, dimple Narkhede win the show
जळगावात रंगला 'द ब्युफा पॅजंट फॅशन शो', डिंपल नारखेडे ठरली किताबाची मानकरी

जळगाव - मुंबई -पुण्यासारख्या महानगरांच्या धर्तीवर जळगावातील डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयात अनोख्या 'फॅशन शो'चे आयोजन करण्यात आले होते. 'द ब्युफा पॅजंट फॅशन शो 2019' नावाने हा फॅशन शो पार पडला. या फॅशन शोचे यंदाचे दुसरे वर्षे होते. डिंपल नारखेडे या विद्यार्थिनीने 'मिस ब्युफा 2019' किताब आपल्या नावे केला.

ग्रामीण भागातील युवतींच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव मिळावा. त्यांना फॅशन शो ही संकल्पना कळावी. त्यांनाही रॅम्प वॉकचा आनंद लुटता यावा, या उद्देशाने डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या वतीने 'द ब्युफा पॅजंट फॅशन शो' आयोजित करण्यात आला होता. या फॅशन शोमध्ये ५५ मॉडेल्सने वेगवेगळ्या ६ थिम्सवर रॅमवॉक करत आपला जलवा दाखवला.

हेही वाचा -कंगना VS वरुण धवन : 'पंगा' आणि 'स्ट्रीट डान्सर'मध्ये कोण मारणार बाजी?

विशेष म्हणजे, महाविद्यालयाच्या फॅशन अँड ब्युटी थेरेपी विभागाच्या विद्यार्थिनींनीच ड्रेस डिझाईन तसेच मॉडेल्सचा मेकअप केला होता.
दरम्यान, लेवा एज्युकेशनल युनियनच्या शताब्दी महोत्सवी वर्षानिमित्त भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचाच एक भाग म्हणून हा फॅशन शो आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थिनींनी कार्यक्रमाचे केलेले उत्तम नियोजन तसेच स्पर्धकांचे सादरीकरण पाहून उपस्थितांनी दाद दिली.

हेही वाचा -'सिंघम', 'सिंबा', 'सूर्यवंशी'ची खास झलक, प्रदर्शनाची तारीख जाहीर

Intro:जळगाव
मुंबई-पुण्यासारख्या महानगरांच्या धर्तीवर जळगावातील डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयात अनोख्या 'फॅशन शो'चे आयोजन करण्यात आले होते. 'द ब्युफा पॅजंट फॅशन शो 2019' नावाने हा फॅशन शो पार पडला. या फॅशन शोचे यंदाचे दुसरे वर्षे होते. डिंपल नारखेडे या विद्यार्थिनीने 'मिस ब्युफा 2019' किताब आपल्या नावे केला.Body:ग्रामीण भागातील युवतींच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांना फॅशन शो ही संकल्पना कळावी, त्यांनाही रॅम्प वॉकचा आनंद लुटता यावा, या उद्देशाने डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या वतीने 'द ब्युफा पॅजंट फॅशन शो' आयोजित करण्यात आला होता. या फॅशन शोमध्ये 55 मॉडेल्सने वेगवेगळ्या 6 थिम्सवर रॅमवॉक करत आपला जलवा दाखवला. विशेष म्हणजे, महाविद्यालयाच्या फॅशन अँड ब्युटी थेरेपी विभागाच्या विद्यार्थिनींनीच ड्रेस डिझाईन तसेच मॉडेल्सचा मेकअप केला होता.Conclusion:दरम्यान, लेवा एज्युकेशनल युनियनच्या शताब्दी महोत्सवी वर्षानिमित्त भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचाच एक भाग म्हणून हा फॅशन शो आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थिनींनी कार्यक्रमाचे केलेले उत्तम नियोजन तसेच स्पर्धकांचे सादरीकरण पाहून उपस्थितांनी दाद दिली.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.