ETV Bharat / sitara

'तुफान' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान फरहान अख्तर जखमी - Farhan Akhtar news

फरहानने त्याच्या हाताचा 'एक्स रे' रिपोर्टचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याच्या हातामध्ये फ्रॅक्चर झाल्याचं पाहायला मिळते.

'तुफान' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान फरहान अख्तर जखमी
author img

By

Published : Oct 13, 2019, 6:50 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर सध्या 'द स्काय ईझ पिंक' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. ११ ऑक्टोंबरला हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात त्याने प्रियांका चोप्रासोबत भूमिका साकारली आहे. त्याच्या आगामी 'तुफान' चित्रपटाबद्दलही बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू आहेत. या चित्रपटाचं काही दिवसांपूर्वीच शूटिंग सुरू झालं आहे. मात्र, शूटिंगदरम्यान फरहानला इजा पोहोचली आहे.

फरहानने त्याच्या हाताचा 'एक्स रे' रिपोर्टचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याच्या हातामध्ये फ्रॅक्चर झाल्याचं पाहायला मिळते.

हेही वाचा -फराह खानच्या आगामी चित्रपटात हृतिकसोबत झळकणार अनुष्का?

'तुफान' हा चित्रपट बॉक्सिंगवर आधारित आहे. हा कोणता बायोपिक नाही. मात्र, बॉक्सिंगपटूची कथा या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. फरहानने आत्तापर्यंत बरेच अपडेट्स सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या चित्रपटाचं दिग्दर्शन राकेश ओमप्रकाश मेहरा हे करत आहेत. फरहानने त्यांच्या 'भाग मिल्खा भाग' या चित्रपटात भूमिका साकारली होती. आता तब्बल ६ वर्षांनी तो 'तुफान' चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटासाठी त्याने बरीच मेहनत घेतली आहे.

हेही वाचा - जंगल सफारीचा थरारक अनुभव भारतीयांना देण्यासाठी 'जंगल क्रूझ' सज्ज

या चित्रपटात त्याच्या लूकवरही बरीच मेहनत घेण्यात आली आहे. त्याने त्याच्या ट्रेनिंग सेशनचेही बरेच फोटो शेअर केले आहेत.

'तुफान' चित्रपट पुढच्या वर्षी २ ऑक्टोंबरला प्रदर्शित होईल.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.