मुंबई - बॉलिवूडमध्ये अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांच्या नात्याच्या नेहमीच चर्चा पाहायला मिळतात. गेल्या बऱ्याच काळापासून दोघे लग्नबंधनात अडकणार असल्याचेही बोलले जात आहे. दोघांनीही आपलं नातं जगजाहीर केल्यानंतर त्यांच्या लग्नाची चाहत्यांना आतुरता आहे. या दोघांच्या नात्याला दोन वर्ष पूर्ण झाले आहेत. त्यानिमित्त फरहानने शिबानीसोबतचा एक फोटो शेअर करुन रोमॅन्टिक अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.
'७३० नॉट आउट', असे कॅप्शन देऊन फरहानने शिबानीसोबतचा एक रोमॅन्टिक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये दोघांचीही खास केमेस्ट्री दिसून येते. शिबानीनेही हा फोटो आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केला आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हेही वाचा -मुलगी श्वेतासाठी बिग बींनी शेअर केली भावनिक पोस्ट
शिबानी आणि फरहान नेहमीच एकमेकांसोबतचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. फरहानचा आगामी 'तुफान' चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दोघेही लग्नबंधनात अडकणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर, फरहान हा सध्या 'तुफान' चित्रपटाच्या पोस्ट प्रोडक्शनमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटात तो बॉक्सरच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटासाठी त्याने आपल्या लुकवर बरीच मेहनत घेतली आहे.
हेही वाचा -'इंडियन आयडल ११'च्या सेटवर परिक्षकांना अश्रु अनावर, पाहा 'ग्रँड फिनाले'चा प्रोमो
'भाग मिल्खा भाग' या चित्रपटानंतर तब्बल ६ वर्षांनी त्याने दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्यासोबत या चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री मृणाल ठाकुर, परेश रावल, ईशा तलवार, रितेश सिद्धवानी, पीएस भारती आणि राजीव टंडन यांचीही महत्वपूर्ण भूमिका पाहायला मिळणार आहे. २ ऑक्टोंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.