ETV Bharat / sitara

'चोर किंवा चौकीदार म्हटलेले नाही' परंतु, 'पंतप्रधान म्हणून मनातील सर्व आदर संपला'

author img

By

Published : Apr 20, 2019, 7:09 PM IST

साध्वी प्रज्ञा सिंहचे मोदींनी समर्थन केल्यामुळे फराह खान अलीचा राग अनावर...मी मोदींना चोर किंवा चौकीदार म्हटले नाही...पण पंतप्रधान म्हणून मनात असलेला आदर संपला, असे फराह म्हणाली

पंतप्रधान म्हणून मनात असलेला आदर संपला

मुंबई - साध्वी प्रज्ञा सिंह निवडणूकीच्या मैदानात उतरल्यानंतर वातावरण बरेच तापले आहे. मालेगाव बॉम्ब स्फोटात आरोपी असलेल्या साध्वीला भाजपने तिकीट तर दिले पण संयमाच्या गोष्टी सांगायचे राहून गेले. एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांचा मृत्यू आपण शाप दिल्याने झाल्याचे वक्तव्य त्यांनी केल्यानंतर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया येणे सुरू झाले.

बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी साध्वीच्या या विधानाची खिल्ली उडवली. यात स्वरा भास्कर, राहुल ढोलकिया, वरुण ग्रोव्हरसह अनेकांचा समावेश होता. ज्वेलरी डिझायनर आणि बॉलिवूड अभिनेता संजय खान यांची मुलगी फराह खान अली हिनेही आपली प्रतिक्रिया ट्विटरवर दिली आहे.

  • I have so far NEVER called the PM Narendra Modi a “Chor” or a Chowkidar. But his blatant support for Sadhvi Pragya where he fields her as a BJP candidate makes me lose any and all respect I had for him as PM of this country. Fielding an alleged terrorist is heinous. Not done !!!

    — Farah Khan (@FarahKhanAli) April 20, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

फराह खान अलीने साध्वी प्रज्ञा ठाकूर यांच्या वादग्रस्त विधानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर आपले मत व्यक्त केले आहे. ती ट्विटरवर लिहिले आहे, "आतापर्यंत मी मोदी यांना चोर किंवा चौकीदार म्हटलेले नाही. परंतु साध्वी प्रज्ञाचे समर्थन करणे आणि उमेद्वारी देण्याने या देशाचे पंतप्रधान म्हणून असलेला माझ्या मनातील सर्व आदर संपला आहे. दहशतवादी हल्ल्यातील आरोपीला निवडणूकीच्या मैदानात उतरवणे घाणेरडापणा आहे. हे योग्य नाही."

  • Pragya the LIAR, Pragya the alleged TERRORIST, Jhoot bole Kawwa Kaate. 😜
    2008 Malegaon blasts case: Rights panel had found no evidence of torture - Mumbai Mirror https://t.co/TWNnIV6pGZ

फराह खान अली सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. साध्वी प्रज्ञाने आपल्याला कसा त्रास दिला गेला यावर भाष्य केल्यानंतरही फराहने, अशी प्रतिक्रिया दिली होती, "प्रज्ञा खोटारडी आहे. प्रज्ञा दहशतवादाची आरोपी आहे. झूट बोले कौआ काटे." अशा प्रकारे निर्भीडपणे फराहने आपले मत मांडले होते.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.