मुंबई - प्रसिद्ध बंगाली अभिनेते अभिषेक चॅटर्जी (Abhishek Chatrjee) यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 56 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. बुधवारी रात्री उशिरा एका रिएलिटी शोचं शूटिंग संपवून ते घरी परतले होते. त्यांनतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले व त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यानंतर काही वेळेतच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
मीडिया रिपोर्टनुसार, बंगाली टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीतील सुपरस्टार अभिषेक चॅटर्जी हे बुधवारी रात्री शूटिंगवरून परतल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. मात्र त्यांनी रुग्णालयात जाण्यास नकार दिला. त्यांनतर त्यांना घरीच सलाईन लावण्यात आल्याचे समजते. मात्र, त्यानंतरही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही आणि काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.
अभिषेक चॅटर्जी हे बंगाली टीव्ही इंडस्ट्रीमधील लोकप्रिय चेहरा होते.त्यांनी 'इच्छादी', 'पिता', 'अपूर सांगा', 'अंदरमहल', 'कुसुम डोला', 'फागुन बू', 'खारकुटो' यांसारख्या मालिकांमधील त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्यांच्या निधनाच्या बातमीने बंगाली मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे.
हेही वाचा - राधिका मदनने सुरू केले 'सना'चे शुटिंग