मुंबई - निर्मिती सावंत, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सोनाली, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले यांच्यासोबत सिद्धार्थ चांदेकर सुद्धा ‘झिम्मा’ खेळणार आहे हे कळलेच असेल. या ‘झिम्मा’ चे दिग्दर्शन हेमंत ढोमे हे देखील कळलेच असेल. मराठी सिनेसृष्टीतील या आघाडीच्या अभिनेत्रींच्या अभिनयाची जुगलबंदी प्रेक्षकांना एकाच सिनेमात पाहता येणार आहे. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या पोस्टरवरून काहीतरी भन्नाट या चित्रपटात पाहायला मिळेल असे वाटत आहे आणि नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टिझरमधूनही. झिम्मा' हा अत्यंत सकारात्मक भाव असलेला आणि धमाल, मस्ती, मजा असणारा आणि मनोरंजनाचे एक फुल्ल ऑन पॅकेज देणारा कौटुंबिक सिनेमा आहे, हे नक्की.
बायकांच्या मानसिक विश्वात दुसरं कुणीही घुसू शकत नाही तसेच त्यांच्या मनात काय सुरु आहे याचा थांगपत्ता लागणं जरा कठीणच. अशाच वेगवेगळ्या व्यक्तिमत्वाच्या बायका जेव्हा एकत्र येतात तेव्हा जी धमाल होते, तीच आपल्याला 'झिम्मा'मध्ये पाहायला मिळणार आहे. 'झिम्मा' मधील फिरायला निघालेल्या या सात जणींचा इंग्लंड मधील प्रवास अतिशय रंजक पद्धतीने मांडण्यात आला आहे. इंग्लंडला जाण्यासाठी नवऱ्याची परवानगी मागणारी बाई, तिथे जाताना घरातील सदस्यांना अनेक सूचना देणारी बाई, बॅग पॅक करताना भांडणं करणारी आई-मुलगी, घरच्यांना खोटं सांगून फिरायला निघालेली बाई, मुलीच्या काळजीपोटी इंग्लंडला जाण्यासाठी द्विधा मनस्थितीत असलेली आई, तर एकीकडे आईची परवानगी न मागता मी फिरायला जात असल्याचे ठासून सांगणारी तरुणी अशा सात वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेल्या, वेगवेगळ्या विचारांच्या, एकमेकींशी ओळख नसलेल्या या महिलांना त्यांची स्वतःशी आणि इतरांशी एक नवी ओळख करून देणारी ही सफर ठरणार असून ही सफर घडवून आणणार आहे सिद्धार्थ चांदेकर. थोडक्यात निर्माती आणि अभिनेत्री क्षिती जोगच्या म्हणण्याप्रमाणे, ‘सात बाई सात...बायका सात! जिवाची सफर...आता राणीच्या देशात!’
या सिनेमाबद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे सांगतो, "हा सिनेमा बघताना या सात जणींमध्ये कुठेतरी आपणही दडलो आहोत, याची प्रत्येक स्त्रीला नक्कीच जाणीव होईल. सगळी बंधने, जबाबदाऱ्या काही काळासाठी विसरून फक्त स्वतःसाठी स्वछंदी आयुष्य जगणाऱ्या या सात अतरंगी बायकांची धमाकेदार कहाणी प्रेक्षकांना यात पाहता येणार आहे. इंद्रधनुष्याच्या सात रंगांप्रमाणे असणाऱ्या या सात स्त्रिया त्यांच्या आयुष्यातील हे रंग अधिक गडद करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत."
क्षिती जोग, अजिंक्य ढमाळ, विराज गवस, उर्फी काझमी, अनुपम मिश्रा आणि स्वाती खोपकर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. 'चलचित्र कंपनी' प्रस्तुत 'अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट' आणि 'क्रेझी फ्यू फिल्म्स' निर्मित 'झिम्मा' हा सिनेमा येत्या २३ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा - श्रध्दा कपूरने 'सायना' चित्रपट का सोडला? या प्रश्नाला अमोल गुप्तेने दिली बगल
मनोरंजनाचे फुल-ऑन पॅकेज देणारा कौटुंबिक सिनेमा, ’झिम्मा'! - Entertainment full-on package 'Jhimma'
वेगवेगळ्या पार्श्वभूमी असलेल्या आणि एकमेकींशी ओळखही नसलेल्या सात महिला इंग्लँडमध्ये फिरायला जायला निघालेत. त्यांच्या धमाल प्रवासाची कथा झिम्मा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. 'झिम्मा' हा सिनेमा येत्या २३ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.