मुंबई - अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांना जमीन व्यवहार प्रकरणात अटक केली. महाराष्ट्राचे महाविकास आघाडी सरकार आणि केंद्र यांच्यातील वाढलेल्या शाब्दिक युद्धाच्या दरम्यान, राज्यमंत्री नवाब मलिक यांना बुधवारी सकाळी ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी नेण्यात आले.
सूत्रांनी सांगितले की, नवाब मलिक अनेक प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत, त्यानंतर त्यांना ईडीने अटक केली. येथे नवाब मलिक यांच्या ऑफिस ट्विटर अकाउंटवर अनेक ट्विट जारी करण्यात आले आहेत. यातून अल्लू अर्जुनचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा - द राइज : पार्ट-1'चा सुपरहिट संवादही लिहिला गेला आहे.
-
Main jhukega nahi! #WeStandWithNawabMalik pic.twitter.com/c5qfBN6OS0
— Office of Nawab Malik (@OfficeofNM) February 23, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Main jhukega nahi! #WeStandWithNawabMalik pic.twitter.com/c5qfBN6OS0
— Office of Nawab Malik (@OfficeofNM) February 23, 2022Main jhukega nahi! #WeStandWithNawabMalik pic.twitter.com/c5qfBN6OS0
— Office of Nawab Malik (@OfficeofNM) February 23, 2022
ऑफिस ऑफ नवाब मलिक नावाच्या ट्विटर हँडलवर नवाब मलिकच्या अटकेनंतर सातत्याने ट्विट केले जात आहेत. यातील एका ट्विटमध्ये 'ना डरेंगे, ना झुकेंगे'. असे लिहिले आहे. त्याचवेळी एका ट्विटकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. 'पुष्पा' चित्रपटातील दक्षिणेतील अभिनेता अल्लू अर्जुनने बोललेला 'मैं झुकेगा नहीं...' हा प्रसिद्ध आणि हिट डायलॉगही या ट्विटर हँडलवर लिहिला गेला आहे.
शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा बचाव?
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणी एनसीबीने अटक केली तेव्हा नवाब मलिक चर्चेत आले होते. एनसीबीचे झोनल ऑफिसर समीर वानखेडे यांच्या पथकाने मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या एका क्रूझवर छापा टाकला होता, त्यात आर्यन खानलाही अटक करण्यात आली होती.
त्यावेळी नवाब मलिक यांनी एनसीबीचे माजी झोनल अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप केले होते. या प्रकरणी आर्यन खानला २६ दिवसांनी मुंबई उच्च न्यायालयातून जामीन मिळाला आहे. काही काळानंतर समीर वानखेडे यांची दुसऱ्या विभागात बदली करण्यात आली होती.
हेही वाचा - Kangana Ranaut Summoned : कंगना रणौतला समन्स, भटिंडा कोर्टात हजर राहण्याचे निर्देश