ETV Bharat / sitara

फिल्म स्टार्स उत्तम राजकारणी होऊ शकतात का ? - Amitabh

दाक्षिणात्य सिने अभिनेत्यांनी राजकारणात उत्तम कामगिरी केल्याचे दिसून येते. यामध्ये एम जी रामचंद्रन, एम के करुणानिधी, जयललीता आणि एन टी रामाराव यांना आपआपल्या राज्याच्या विकासात मोठी भर घातल्याचे दिसते.

राजकारणात उतरलेले कलाकार
author img

By

Published : Apr 29, 2019, 8:30 PM IST

Updated : Apr 29, 2019, 9:26 PM IST

मुंबई - लोकसभा आणि विधानसभांच्या जेव्हा निवडणूका येतात तेव्हा अनेक राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी कलावंत आणि खेळाडूंचा स्टार प्रचारक म्हणून उपयोग करतात. याचा चांगला लाभ झाल्याची उदाहरणे आहे. इतकेच नाही तर त्यांना उमेद्वारी देऊन निवडणूक जिंकण्याचाही प्रयोग यशस्वी झालेला दिसतो. जिथे विरोधक भक्कम असतात, त्या ठिकाणी लोकप्रिय कलाकार निवडणूकीला उभे केल्याचा फायदा त्या पक्षाच्या पथ्यावर पडल्याची बरीच उदाहरणे आहे. अमिताभ बच्चन, राजेश खन्ना, शत्रुघ्न सिन्हा, विनोद खन्ना, हेमा मालिनी, धर्मेंद्र, गोविंदा, जयाप्रदा, चिरंजीवी यांच्यासारखे लोकप्रिय कलाकार संसदेत पोहोचले होते.

सध्या सुरु असलेल्या निवडणूकीतही मुंबईतून उर्मिला मातोंडकर, पटना साहिबमधून शत्रुघ्न सिन्हा यांना काँग्रेसने उमेद्वारी दिली आहे. तर गुरुदासपूरमधून सनी देओल, मथूरेतून हेमा मालिनी, चंदीगडमधून किरण खेर यांना भाजपने उमेद्वारी दिली आहे. जयाप्रदा यावेळी भाजपकडून लोकसभा लढवीत आहेत. त्यांनी यापूर्वी तेलुगु देसम, समाजवादी पक्षाकडून खासदारकीचा लाभ उठवला होता. महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे अभिनेता अमोल कोल्हे निवडणूकीच्या मैदानात उतरला आहे.

सिने कलाकारांचा अधिक प्रभाव दाक्षिणात्य राज्यात दिसून येतो. नेमके याची नस ओळखूनच कलाकारांनी राजकारणात आपला उत्तम उपयोग करुन घेतला. तामिळनाडू याबाबतीत आघाडीवर आहे. एम जी रामचंद्रन यांची प्रचंड लोकप्रियता होती. याचा लाभ त्यांना पुरेपुर झाला. ते आपल्या लोकप्रियतेच्या बळावर तामिळनाडूचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर एम के करुणानिधींनीदेखील त्यांच्या पावलावर पाऊल टाकत मुख्यमंत्रीपदाची धरा सांभाळली. हीच परंपरा पुढे जयललीता यांनीदेखील चालवली. या तिनही मुख्यमंत्र्यांची कारकिर्द उत्तम राहिली आहे. लगतच्या आंध्रप्रदेश राज्यातही तत्कालिन सुपरस्टार एन टी रामाराव यांनी तेलुगु देसम पक्षाची स्थापना करुन काँग्रेसच्या सत्ताधिशांनी जबरदस्त धक्का दिला होता. आणिबाणीनंतर काँग्रेस विरोधी लाटेवर स्वार होत एनटीआर मुख्यमंत्री झाले. त्यांची प्रचंड लोकप्रियता राजकारात फायदेशीर ठरली आणि त्यांनी उत्तम काम या राज्यासाठी केले.

एनटीआर नंतर असाच एक प्रयोग तेलुगु सुपरस्टार चिरंजीवींनी केला होता. त्यांनी प्रजा राज्यम नावाचा पक्ष स्थापन करुन आंध्रमध्ये जबरदस्त वातावरण तयार केले. मात्र सत्ता मिळवण्यापर्यंत बहुमत त्यांना मिळू शकले नाही. सध्या त्यांचा लहान भाऊ सुपरस्टार पवन कल्याण याने जनसेना या पक्षाची स्थापना केली आहे. आंध्रमधून त्याचा पक्ष निवडणूकीच्या मैदानात उतरला आहे.

तामिळनाडूत यंदाच्या निवडणूकीत रजनीकांत आपले उमेद्वार उभे करणार अशी चर्चा होती. मात्र अद्याप त्याने पक्ष स्थापनेची घोषणा केलेली नाही. मात्र कमल हासनने आपल्या पक्षाची स्थापना करीत लोकसभेसाठी उमेद्वार उभे केले आहेत.

कर्नाटकातही अभिनेता प्रकाश राजने स्वतःला आजमवण्याचा प्रयत्न केलाय. पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर प्रकाश राज राजकीय भाष्य करु लागला. त्याच्या रोखठोक भूमिकेने त्याने लोकांना आकर्षित केले. या निवडणूकीत त्याने बंगळूरमधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आहे.

भारतीय राजकारणाच्या इतिहासात सिने कलावंतांचा प्रत्यक्ष सहभाग वाढताना दिसतोय. निवडणूकीत यश मिळवलेल्या सर्वांनाच राजकारणात आपला टिकाव कायमचा ठेवता आलेला नाही. असे असले तरी दाक्षिणात्य कलाकारांनी मात्र आपल्या यशाची कमान उंचावत ठेवली आहे.

Intro:Body:

ent NEWS

Conclusion:
Last Updated : Apr 29, 2019, 9:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.