ETV Bharat / sitara

कंगनाशी टि्वटरवरील पंगा पडला फायद्यात; दिलजीत दोसांजच्या फॉलोवर्समध्ये 5 लाखांची वाढ - दिलजित दोसांझ अपडेट

अभिनेत्री कंगना रणौत आणि पंजाबी अभिनेता आणि गायक दिलजित दोसांझ यांच्यात टि्वटर वॉर सुरू आहे. यामुळे नेटकऱ्यांचे मनोरंजन होत आहेच. मात्र, यासोबतच गायक दिलजित दोसांझला कंगनासोबत घेतलेला पंगा फायद्यात पडल्याचे दिसत आहे. दिलजित दोसांझचे टि्वटर फॉलोवर्स 5 लाखाने वाढले आहेत.

कंगना-दिलजित
कंगना-दिलजित
author img

By

Published : Dec 5, 2020, 5:21 PM IST

मुंबई - दिल्लीमध्ये कृषी कायद्यांविरोधात आंदोलन सुरू आहे. आंदोलनातील शेतकऱ्यांवर वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी अभिनेत्री कंगना रणौत आणि पंजाबी अभिनेता आणि गायक दिलजित दोसांझ यांच्यात टि्वटर वॉर सुरू आहे. यामुळे नेटकऱ्यांचे मनोरंजन होत आहेच. मात्र, यासोबतच गायक दिलजित दोसांझला कंगनासोबत घेतलेला पंगा फायद्यात पडल्याचे दिसत आहे. कंगना विरुद्ध दिलजित दोसांझ यांच्यात टि्वटर युजर्सनी दिलजित यांचा पक्ष घेतला आहे. दिलजित दोसांझचे टि्वटर फॉलोवर्स 5 लाखाने वाढले आहेत.

Diljit gains close to 5 lakh Twitter followers amid spat with Kangana
दिलजित दोसांझचे टि्वटर फॉलोवर्स 5 लाखाने वाढले

गेल्या 29 नोव्हेंबरला त्यांचे 38 लाख 37 हजार 703 फॉलोवर्स होते. तर 4 डिसेंबरला त्यांचे 46 लाखापेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. तसेच टि्वटरवर #DiljitDestroysKangana आणि #DiljitVsKangana हे दोन ह‌ॅशट‌ॅग शुक्रवारी ट्रेंड करत होते.

कृषी आंदोलनातील एका महिलेवर कंगनाने टि्वट केल्यानंतर कंगना रणौत आणि दिलजित दोसांझ यांच्या वादाला सुरवात झाली होती. शेतकरी आंदोलनात 100 रुपये देऊन एक वृद्ध महिला सहभागी झाल्याचे वक्तव्य कंगना रणौतने केले होते. तसेच दिलजीत दोसांजला कंगनाने एका ट्विटमध्ये करण जोहरचा 'पालतू' (पाळीव) असल्याचे म्हटले होते. तिच्या या वक्तव्यावर दिलजीतने संताप व्यक्त करत ट्विटरवर कंगनाला चांगलेच फटकारले होते.

कंगनाचे टि्वट -

दिलजीत दोसांजला कंगनाने एका ट्विटमध्ये करण जोहरचा 'पालतू' (पाळीव) म्हटलं. शाहिनबागच्या आंदोलनात सहभागी झालेली ही आजी 100 रुपयांसाठी कोणत्याही आंदोलनात सहभागी होते, असे कंगनाने म्हटल्यानंतर दिलजीतने कंगनाला चांगलेच धारेवर धरले. दिलजीतने तिला पंजाबी भाषेत प्रत्युत्तर दिलं

दिलजीतकडून कंगनाला ट्विटरवॉरमध्ये धोबीपधाड -

एखाद्या व्यक्तीने एवढं आंधळ असू नये. तु आत्तापर्यंत ज्या लोकांसोबत काम केले आहे. त्यांची पण तू पालतू आहेस का? हे बॉलिवूड नसून पंजाबी लोकांचा मुद्दा आहे. खोटे बोलून आणि लोकांच्या भावना भडकावण्याचं काम तू चांगलं करतेस, असे ट्विट दिलजीत सिंग दोसांज याने केले. याला पुन्हा कंगनाने उत्तर दिले. यानंतर दोघांमध्ये ट्विटरवर चांगलीच जुंपली.

हेही वाचा - शेतकरी आंदोलनावरून कंगना रणौत आणि पंजाबी गायक दिलजीतमध्ये जुंपली

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.