धुरळा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आणि, पाहता पाहता टिजर प्रमाणेच ट्रेलरही सोशल मीडियाच्या ट्रेंडिग लिस्ट मध्ये सामील झाला. एका दिवसात या ट्रेलरला तब्बल दहा लाख व्हि्यूज मिळाले आहेत.
मराठी सिनेमाचा ट्रेलर असा पब्लिकली लाँच होण्याची ही पहिलीच वेळ. त्यामुळे नव्या वर्षात रिलीज होणाऱ्या पहिल्याच सिनेमामुळे नव्या वर्षाची सुरुवात धुरळा उडवणारी असल्याची चर्चा आता सर्वत्र सुरू आहे.
मोठ्या गॅपनंतर सिद्धार्थ जाधव आणि सोनाली कुलकर्णी एकत्रितपणे पुनरागमन करत आहेत. तर, आजपर्यंत सोशिक सुनेच्या भूमिकेत दिसलेल्या अलका कुबल यांची सरप्राईज करणारी व्यक्तिरेखा धुरळातून आपल्या भेटीस येणार आहे.
तर, सई ताम्हणकर, अंकुश चौधरी, प्रसाद ओक, अमेय वाघ यांच्या फर्स्ट लूकच्या चर्चेचा धुराळा फेसबुक आणि इंस्टाग्रामवर उडालाय.
धुरळा हा चित्रपट निवडणुकीची रणधुमाळी, प्रचाराची लगबग, राजकीय शत्रुत्व, महिलांचं राजकारणातलं अस्तित्व, विजयाचा गुलाल, राजकारणात डोकावू पाहणारी तरुणाई असे राजकारणाचे विविध रंग या ट्रेलरमध्ये दिसत आहेत.
अलका कुबल, अंकुश चौधरी, प्रसाद ओक, सई ताम्हणकर, सिद्धार्थ जाधव, सुलेखा तळवलकर, सोनाली कुलकर्णी, अमेय वाघ, प्रियदर्शिन जाधव आणि उमेश कामत अशी सिनेमाची तगडी स्टारकास्ट आहे.
सध्या इंस्टाग्रामवर धुरळाचा फिल्टर प्रचंड लोकप्रिय असून, धुरळा फिल्टर केलेले व्हिडिओज, फोटोज, प्रोफाईल फोटोज प्रचंड व्हायरल होत आहेत. मराठी सिनेमासाठी इंस्टाग्रामने स्वतःहून फिल्टर रिलीज करण्याची देखील ही पहिलीच वेळ आहे.
आता ट्रेलर रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये हव्वा आणि धुरळा फक्त ३ जानेवारी रोजी धुरळाच्या रिलीज होण्याचाच आहे.