ETV Bharat / sitara

धर्मेंद्र यांनी शेअर केला करणचा बालपणीचा फोटो

करणच्या निमित्ताने देओल कुटुंबाची तिसरी पिढी बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. यापूर्वी देओल कुटुंब हे अॅक्शन चित्रपटांसाठी ओळखले जात होते. मात्र, करण देओल हा एका रोमॅन्टिक चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

धर्मेंद्र यांनी शेअर केला करणचा बालपणीचा फोटो
author img

By

Published : Sep 15, 2019, 8:10 PM IST

मुंबई - बॉलिवूडचे धरम पाजी म्हणजे धर्मेंद्र यांचा नातू करण देओल हा बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज झाला आहे. त्याचा 'पल पल के दिल के पास' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं सध्या जोरदार प्रमोशन सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. एका रोमॅन्टिक कथेवर आधारित हा चित्रपट असणार आहे. अशातच धर्मेंद्र यांनी करणचा बालपणीचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये करण खूपच क्यूट दिसत आहे.

करणच्या निमित्ताने देओल कुटुंबाची तिसरी पिढी बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. यापूर्वी देओल कुटुंब हे अॅक्शन चित्रपटांसाठी ओळखले जात होते. मात्र, करण देओल हा एका रोमॅन्टिक चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरनंतर चाहत्यांनी करणच्या अभिनयाची प्रशंसा केली. या चित्रपटात त्याच्यासोबत सहेर बांबा ही नवोदीत अभिनेत्री झळकणार आहे.

हेही वाचा-महिन्याला दीड हजार कमावणाऱ्या अमरावतीच्या बबिता ताडे झाल्या करोडपती, पाहा व्हिडिओ

सनी देओलनेच या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटातील अरिजीत सिंगच्या आवाजातील टायटल ट्रॅकनेही प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या चित्रपटातील दुसरं गाणं देखील प्रदर्शित झालं आहे. या गाण्यात करणच्या आवाजातही रॅप आहे.

धर्मेंद्र यांनी शेअर केलेल्या फोटोवर चाहत्यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसंच त्याच्या बॉलिवूड पदार्पणासाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

१९८३ साली सनी देओलने 'बेताब' चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण केलं होतं. आता ३६ वर्षानंतर त्याचा मुलगा करण हा 'पल पल दिल के पास' या चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण करत आहे. २० सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

हेही वाचा-'तुला मार्ग दाखवायला मी नेहमी तुझ्यासोबत असेल', अक्षयने मुलाला 'अशा' दिल्या शुभेच्छा!

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.