ETV Bharat / sitara

जाहिरातींसाठी ‘नॅशनल क्रश’ रश्मिका मंदाना बनतेय ‘हॉट प्रॉपर्टी’! - रश्मिका मंदानाचे बॉलिवूड पदार्पण

‘मिशन मजनू' या बॉलिवूड प्रोजेक्टच्या घोषणेनंतर आतापासूनच खळबळ उडवून देणारी रश्मिका मंदाना ही चर्चित विषय बनली आहे. 'डियर कॉम्रेड' आणि 'गीता गोविंदम' सारख्या चित्रपटांनी या अभिनेत्रीने लाखो-करोडो प्रेक्षकांची मने जिंकली आहेत आणि नेटिझन्ससाठी ती नॅशनल क्रश आहेच. आता तिच्याकडे जाहिरातींसाठी मागणी वाढली आहे.

rashmika-mandana
रश्मिका मंदाना
author img

By

Published : Mar 31, 2021, 8:01 PM IST

मुंबई - रश्मिका मंदानाने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवल्यापासूनच लोकप्रियतेने तिची पाठ सोडली नाहीये. आता तर ती हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करतेय आणि तिला ‘नॅशनल क्रश’ चा दर्जा मिळालाय. साहजिकच जाहिरातक्षेत्रात तिची मागणी वाढली आहे.

‘मिशन मजनू' या तिच्या बॉलिवूड प्रोजेक्टच्या घोषणेनंतर आतापासूनच खळबळ उडवून देणारी रश्मिका मंदाना ही चर्चित विषय बनली आहे. बॉलिवूडमध्ये पदार्पण होण्यापूर्वीच अभिनेत्री 'हॅपी-गो-लकी’ वागणं आणि प्रेक्षकांशी संपर्क साधण्याच्या क्षमतेमुळे ती ब्रॅण्ड्स सर्किटमधील हॉट प्रॉपर्टी बनली आहे. ती सिद्धार्थ मल्होत्रासोबत रॉनी स्क्रूवाला यांच्या ‘मिशन मजनू’ मधून बॉलिवूड पदार्पण करतेय आणि तिची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.

‘जो बिकता हैं वो दिखता हैं’ या उक्तीवर ऍडव्हर्टाइसिंग वर्ल्ड चालत असते म्हणूनच दरवर्षी वेगवेगळ्या प्रॉडक्ट्स साठी निरनिराळे यशस्वी चेहरे जाहिरातींमधून दिसत असतात. रश्मिका मंदानाच्या जवळच्या स्त्रोताने सांगितले की, ‘रश्मिका मोठमोठ्या ब्रँड्सच्या जाहिरातींसाठी आघाडीवर आहे. जवळपास सर्वच प्रकारच्या ए-लीग ब्रँड्सची तिच्या नावाला पसंती आहे. लाइफस्टाइल ब्रँडपासून फॅशन ब्रँडपर्यंत, ब्युटी ब्रँडपासून तंत्रज्ञान ब्रँडपर्यंत सर्वच रश्मिका ची निवड करण्यासाठी धडपडत आहेत. ​तिची पॅन-इंडिया लोकप्रियता हा एक अतिरिक्त फायदा आहे, ज्यामुळे ती ब्रॅन्ड्सची आवडती आहे.’ “तिने अलीकडेच जागतिक ग्लोबल फूड चेन साठी हो म्हटले आहे. तिची व्यापक पोच आणि सहजतेने कनेक्ट होण्याची क्षमता यामुळे टॉप ब्रॅण्ड तिच्याकडे आकर्षित होताहेत" स्त्रोत पुढे म्हणाला.

'डियर कॉम्रेड' आणि 'गीता गोविंदम' सारख्या चित्रपटांनी या अभिनेत्रीने लाखो-करोडो प्रेक्षकांची मने जिंकली आहेत आणि नेटिझन्ससाठी ती नॅशनल क्रश आहेच. रश्मिका स्वतः सिद्धार्थ मल्होत्रा ​​सह 'मिशन मजनू' चित्रपटाद्वारे बॉलिवूड पदार्पण करण्यासाठी खूप उत्सुक आहे.
हेही वाचा - 'वेल डन बेबी’: पाहा, पुष्कार जोग आणि अमृता खानवीलकरची संवेदनशील मुलाखत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.