ETV Bharat / sitara

...म्हणून 'छपाक'च्या सेटवर दीपिका झाली भावूक - meghana guljar

अॅसिड हल्यासारखा अत्यंत संवेदनशील विषय 'छपाक' चित्रपटात मांडण्यात येणार आहे. अॅसिड हल्यानंतर पीडित व्यक्तीचे आयुष्य किती कठिण बनते, हे या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. दिग्दर्शिका मेघना गुलजार या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.

...म्हणून 'छपाक'च्या सेटवर दीपिका झाली भावूक
author img

By

Published : May 31, 2019, 12:38 PM IST

मुंबई - दीपिका पदुकोन लवकरच 'छपाक' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रणवीर सिंगसोबत लग्न झाल्यानंतरचा हा तिचा पहिलाच चित्रपट आहे. अॅसिड हल्यातून वाचलेल्या आणि इतरांना प्रेरणा देणाऱ्या लक्ष्मी अग्रवाल यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटात दीपिका पहिल्यांदाच अशा प्रकारची भूमिका साकाराताना दिसणार आहे. सध्या या चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. दरम्यान चित्रपटाच्या एका सीनदरम्यान दीपिका भावूक झाली होती.

अॅसिड हल्यासारखा अत्यंत संवेदनशील विषय 'छपाक' चित्रपटात मांडण्यात येणार आहे. अॅसिड हल्यानंतर पीडित व्यक्तीचे आयुष्य किती कठिण बनते, हे या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. दिग्दर्शिका मेघना गुलजार या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. चित्रपटाच्या एका सिन दरम्यान दीपिका खूपच भावूक झाली होती. मेकअप करून आल्यानंतर या सिनमुळे ती विचलित झाली होती. तिच्या डोळ्यातून अश्रू येत होते. त्यामुळे थोडावेळ शूटिंग थांबवण्यात आली होती.

दीपिकाने कसेबसे स्वत:ला सावरले. त्यानंतर चित्रपटाचे पुढिल शूटिंग पूर्ण करण्यात आले. काही कथा इतक्या भावनिक असतात, की त्या शूट करताना कलाकारांना त्यांच्या भावनांना आवरणे कठिण होते. 'छपाक'च्या या सीनपूर्वी दीपिकाने मेघना गुलजार यांच्याशी बराच वेळ चर्चा केली होती. त्यानंतर ती जेव्हा सेटवर आली तेव्हा तिला अश्रू अनावर झाले.

दीपिकाच्या या चित्रपटाची चाहत्यांनाही आतुरता आहे. हा चित्रपट १० जानेवारी २०२० रोजी प्रदर्शित होणार आहे. मेघना गुलजार यांनी यापूर्वी आलिया भट्टला घेऊन 'राजी' चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता. आता 'छपाक' चित्रपटाला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Intro:Body:

Ashvini

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.