मुंबई - बॉलिवूडची लोकप्रिय जोडी म्हणून ओळखले जाणारे 'दीपवीर' म्हणजेच दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग सोशल मीडियावरही चर्चेत असतात. चाहत्यांमध्ये या दोघांची मोठी क्रेझ आहे. अलिकडेच दीपिका 'छपाक' चित्रपटामुळे चर्चेत आली होती. तर, रणवीर सिंगदेखील त्याच्या आगामी '८३' चित्रपटामुळे चर्चेत आहे.
रणवीर सिंगने '८३' चित्रपटाचे दमदार टीझर पोस्टरही शेअर केले आहे. तसेच या चित्रपटातील कलाकरांसोबतचाही एक फोटो त्याने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या पोस्टवर चाहत्यांनी भरभरुन प्रतिक्रिया दिल्या आहेत. मात्र, यामध्ये दीपिकाने केलेली कमेंट ही व्हायरल होत आहे.
हेही वाचा -अपारशक्ती खुराना-प्रनुतनची जमणार जोडी, 'हेलमेट'चे शूटिंग पूर्ण
दीपिकाने रणवीरच्या फोटोवर कमेंटमध्ये लिहिले आहे, की '१ किलो मैसुरपाक आणि अडिच किलो मसालेदार हॉट चिप्स आणल्याशिवाय परत येऊ नको'. दीपिकाच्या या कमेंटवरही चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
रणवीरने '८३' च्या पोस्टर लॉन्च कार्यक्रमासाठी चेन्नई येथे हजेरी लावली होती. या चित्रपटात रणवीर कपिल देव यांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्यासोबत ताहिर राज भसीन, साकिब सलिम, जतीन सारना, चिराग पाटील, दिनकर शर्मा, निशांत दहिया, हार्डी संधु, साहिल खट्टर, एमी विर्क, आदिनाथ कोटारे, धैर्य करवा आणि पंकज त्रिपाठी ही स्टारकास्ट देखील झळकणार आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
कबीर खान यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. १० एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होईल.
हेही वाचा -'जवानी जानेमन': अलायाची ईटीव्ही भारतशी खास मुलाखत