ETV Bharat / sitara

टीम ‘सरसेनापती हंबीरराव' तर्फे मोफत रुग्णवाहिकेचे अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण!

महाराष्ट्रातील कोरोना विरोधातील लढाईत मनोरंजन सृष्टीही मागे नाही. शिवकालीन चित्रपट 'सरसेनापती हंबीरराव टीम'ने यासाठी पुढाकार घेतला असून एक रुग्णवाहिका पुणेकरांच्या सेवेला अर्पण केली. याप्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले.

मोफत रुग्णवाहिकेचे पुण्यात लोकार्पण
author img

By

Published : Apr 12, 2021, 11:47 AM IST

कोरोना विषाणूचा पुन्हा झालेला उद्रेक महाराष्ट्राला जास्त सतावत आहे. रुग्णांना चांगली वैद्यकीय सेवा मिळावी म्हणून शासन प्रयत्न करीत असतानाच मनोरंजनसृष्टीही पुढे सरसावली आहे. शिवकालीन चित्रपट 'सरसेनापती हंबीरराव टीम' प्रदर्शनासाठी तयार होता असून चित्रपटाच्या टीमने सामाजिक बांधिलकी जपत एक रुग्णवाहिका पुणेकरांच्या सेवेला अर्पण केली. याप्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले.

Dedication of free ambulance in Pune
मोफत रुग्णवाहिकेचे पुण्यात लोकार्पण

आजही राज्यावर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकट असताना पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकी म्हणून समाजहितासाठी काहीतरी करण्याचा विचार टीम सरसेनापती हंबीररावच्या मनात होता. त्यादृष्टीने टीम सरसेनापती हंबीरराव तर्फे पुणे शहरासाठी ऑक्सिजनसह सर्व सोई सुविधायुक्त विनामूल्य सेवा देणाऱ्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. ही रुग्णवाहिका संपूर्ण पुणे शहरासाठी विनामूल्य उपलब्ध आहे.

आगामी 'सरसेनापती हंबीरराव' या मराठी चित्रपटाचे निर्माते संदीप रघुनाथराव मोहिते पाटील यांच्या संकल्पनेतून सामाजिक बांधिलकी म्हणून मोफत रुग्णवाहिका या सेवेचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. इथून पुढेही ज्या ज्या वेळी आपले राज्य किंवा देश संकटात असेल त्यावेळी सामाजिक भान जपत मदतीचा हात देण्यास आमची संपूर्ण 'सरसेनापती हंबीरराव टीम' नेहमीच अग्रेसर असेल, असे संदिप मोहिते पाटील आणि सौजन्य निकम यांनी सांगितले.

पुणे शहरात या मोफत सेवेसाठी पुढील क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन त्यांनी केले: 8208433345, 7775078167

हेही वाचा - शीतल अहिरराव आणि वृषभ शहा यांचे ‘मंगलाष्टक रिटर्न'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.