ETV Bharat / sitara

'या' खतरनाक व्हिलनचा मुलगा करणार बॉलिवूड डेब्यू, पाहा फोटो - sqauad film news

जॉन अब्राहमच्या आगामी 'स्क्वाड' चित्रपटात तो झळकणार आहे. त्याने सोशल मीडियावर जॉनसोबतचा फोटो शेअर करुन याबद्दल माहिती दिली आहे.

बॉलिवूडच्या 'या' खतरनाक विलनच्या मुलगा करणार बॉलिवूड डेब्यू, पाहा फोटो
author img

By

Published : Sep 16, 2019, 1:42 PM IST

Updated : Sep 16, 2019, 4:02 PM IST

मुंबई - बॉलिवूडमध्ये स्टारकिड्सची एन्ट्री होणं हा आता ट्रेण्ड झाला आहे. आत्तापर्यंत बऱ्याच मोठ्या मोठ्या कलाकारांच्या मुलांनी बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेऊन आपल्या करिअरचा मार्ग निवडला आहे. आता यामध्ये आणखी एका स्टारकिडची एन्ट्री होणार आहे. विशेष म्हणजे हा स्टार बॉलिवूडचा एकेकाळचा खतरनाक व्हिलन म्हणून ओळखला जात होता. त्याचा मुलगा आता जॉन अब्राहमसोबत झळकण्यासाठी सज्ज झाला आहे.

हा खतरनाक विलन म्हणजे डॅनी डेंजोग्पा. विलनच्या भूमिका साकारुन डॅनीची ओळख विलनचीच बनली होती. त्याचा मुलगा रिंजिंग डेंजोग्पा हा आता बॉलिवूड एन्ट्रीसाठी सज्ज झाला आहे. जॉन अब्राहमच्या आगामी 'स्क्वाड' चित्रपटात तो झळकणार आहे. त्याने सोशल मीडियावर जॉनसोबतचा फोटो शेअर करुन याबद्दल माहिती दिली आहे.

हेही वाचा-'ड्रीमगर्ल'ची बॉक्स ऑफिसवर यशस्वी वाटचाल, जाणून घ्या आत्तापर्यंतची कमाई

'स्क्वाड' चित्रपटात रिंजिंगसोबत जॉन अब्राहम, मालविका, तनिषा ढिल्लन यांची मुख्य भूमिका असणार आहे. या चित्रपटाचं शूटिंग बेलारूसला होणार आहे. त्यासाठी चित्रपटाची संपूर्ण टीम रवाना होणार आहे. त्यापूर्वी जॉनने रिंजिंगला फिटनेसचे धडेही दिले.

'स्क्वाड' हा एक अॅक्शनपट असणार आहे. या चित्रपटात अॅक्शनसोबतच रोमान्सही दाखवला जाणार आहे. रिंजिंगचा पहिलाच चित्रपट अॅक्शनपट असल्याने तो अॅक्शनहिरो म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता डॅनीनंतर त्याच्या मुलाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा-कल्याणमध्ये नाट्यरसिक उत्तम, रस्ते मात्र थर्ड क्लास; प्रशांत दामलेंची टीका

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Sep 16, 2019, 4:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.