ETV Bharat / sitara

चित्रपटाच्या प्रमोशनसाठी 'दंबग ३'ची टीम हैदराबादमध्ये दाखल - kiccha sudeep in dabangg 3 promotion

अलिकडेच या चित्रपटाच्या टीमने हैदराबाद येथे हजेरी लावली. यावेळी सलमान खानसोबत सहकलाकार सई मांजरेकर, सोनाक्षी सिन्हा, किच्चा सुदीप आणि दिग्दर्शक प्रभू देवा उपस्थित होते.

Dabangg 3 team reached at hyderabad
चित्रपटाच्या प्रमोशनसाठी 'दंबग ३'ची टीम हैदराबादमध्ये दाखल
author img

By

Published : Dec 19, 2019, 4:32 PM IST

मुंबई - बॉलिवूडचा भाईजान सलमान खान त्याच्या 'दबंग ३' चित्रपटातून प्रेक्षकांना भेटण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच हा चित्रपट बराच चर्चेत राहिला. ट्रेलरवरही चाहत्यांच्या बऱ्याच प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. या चित्रपटातील गाणीदेखील सोशल मीडियावर हिट झाली आहेत. हिंदीसह तेलुगू आणि तमिळ भाषेतही हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्यामुळे दाक्षिणात्य राज्यांमध्ये चित्रपटांचे प्रमोशन करण्यात येत आहे.

अलिकडेच या चित्रपटाच्या टीमने हैदराबाद येथे हजेरी लावली. यावेळी सलमान खानसोबत सहकलाकार सई मांजरेकर, सोनाक्षी सिन्हा, किच्चा सुदीप आणि दिग्दर्शक प्रभू देवा उपस्थित होते.

त्यांच्यासोबत दाक्षिणात्य अभिनेते दग्गुबती वेंकटेश आणि रामचरण यांचीही खास उपस्थिती पाहायला मिळाली. यावेळी त्यांनी सलमानसोबत चित्रपटातील गाण्यांवर डान्सही केला.

हेही वाचा -'महाभारता'तील शकुनी मामासोबत ईटीव्ही भारतची खास बातचीत

रामचरणने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या क्षणाचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये संपूर्ण स्टारकास्टची झलक पाहायला मिळते. सोनाक्षीने देखील सोशल मीडियावर प्रमोशनदरम्यानचे फोटो शेअर केले आहेत.

'दबंग' आणि 'दबंग २' प्रमाणेच चाहत्यांना या चित्रपटाकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. किच्चा सुदीप यामध्ये खलनायकाची भूमिका साकारत आहे. चित्रपटाचे सध्या जोरदार प्रमोशन सुरू आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट काय कमाल दाखवतो, हे पाहणं महत्वाचं ठरेल.

हेही वाचा -बहुप्रतीक्षित 'स्ट्रीट डान्सर थ्रीडी' चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला

Intro:Body:

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.