हैदराबाद - अॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्ससने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक मोठा निर्णय घेतला आहे. यंदाच्या ऑस्कर पुरस्कारासाठी केवळ ऑनलाईन स्ट्रीमिंग चित्रपटानांच परवानगी दिली जाणार आहे. पुरस्काराच्या आयोजकांनी मंगळवारी याबाबत घोषणा केली आहे.
आयोजकांनी म्हटले आहे, की कोरोनाच्या प्रसारामुळे चित्रपटगृह बंद असल्याने तात्पुरत्या स्वरुपात हा निर्णय घेण्यात आला आहे. या अॅकॅडमीच्या प्रमुखांनी सांगितले, की चित्रपटांची ती जादू केवळ चित्रपटगृहांमध्येच अनुभवा येऊ शकते. यावर आमचा ठाम विश्वास आहे आणि हे मत कधीही न बदलणारे आहे. मात्र, कोरोनासारख्या महामारीच्या काळात तात्पुरत्या स्वरुपात ऑनलाईन स्ट्रीमिंगचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.