ETV Bharat / sitara

टॉम क्रूझच्या ''मिशन इम्पॉसिबल-७'' ला बसला कोरोना व्हायरसचा फटका

author img

By

Published : Feb 26, 2020, 2:25 PM IST

टॉम क्रूझच्या आगामी ''मिशन इम्पॉसिबल-७'' या चित्रपटाचे शूटिंग इटलीच्या व्हेनिस शहरता होणार होते. परंतु कोरोना व्हायरसच्या भितीने हे शूटिंग पुढे ढकलण्यात आले आहे.

Tom Cruise
टॉम क्रूझ

व्हेनिस - हॉलिवूड सुपरस्टार टॉम क्रूझच्या आगामी ''मिशन इम्पॉसिबल-७'' या चित्रपटाचे शूटिंग कोरोना व्हायरसच्या भितीमुळे रोखण्यात आले आहे. पॅरामाऊंट पिक्चर्सने ही माहिती दिली आहे.

''मिशन इम्पॉसिबल'' या शूटिंग इटलीच्या व्हेनिस शहरात सोमवारपासून करण्याचे निश्चित झाले होते. रविवारपासून या शहरात होणारा लॅगून सिटी अॅन्यूएल फेस्टीव्हल रद्द करण्यात आला. इटलीमध्ये आतापर्यंत कोरोना व्हायरसचे २२० रुग्ण सापडले आहेत. यानंतर शहरातील गर्दीची ठिकाणे प्रशासनाने बंद केली आहेत. या व्हायरसचा प्रसार होऊ नये यासाठी ही काळजी घेण्यात आली आहे.

पॅरामाऊंट पिक्चर्सचा ''मिशन इम्पॉसिबल'' सिरीजमधील हा सातवा चित्रपट आहे. आजपर्यंतच्या या सिरीजमधील सर्वच चित्रपट हिट ठरले होते. सातव्या भागात टॉम क्रूझ पुन्हा एकदा इथन हंट ही व्यक्तीरेखा साकारत आहे. या सिरीजचे आणि टॉम क्रूझचे जगभर अफाट चाहते आहेत. या सिरीजचा चित्रपट जेव्हा भारतात रिलीज होतो, तेव्हा भारतीय सिनेमांना याचा फटका बसत असतो. यावेळी २३ जुलै २०२१ ला ७ व्या भागाची रिलीज तारीख ठरली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन ख्रिस्टोफर मॅक्वीन करीत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.