ETV Bharat / sitara

'बच्चन पांडे'च्या कालाकारांविरुध्द जैसलमेरच्या कोर्टात तक्रार दाखल

अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेला बच्चन पांडे चित्रपट वादात अडकताना दिसत आहे. या चित्रपटाविरोधात जैसलमेर न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. शूटिंग दरम्यान त्याच्यावर कोविड -१९ मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करून जैसलमेरच्या पर्यटनस्थळांचे नुकसान केल्याचा आरोप आहे. कोर्टाने चित्रपट निर्मात्यांना शूटिंगच्या मान्यतेसाठी कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहे.

Bachchan Pandey's Starcast
अक्षय कुमार
author img

By

Published : Feb 6, 2021, 5:39 PM IST

जैसलमेर - आजकाल जैसलमेरमध्ये अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेल्या बच्चन पांडे चित्रपटाचे शूटिंग सुरु आहे. जे वादाच्या भोवऱयात सापडलेले दिसते. चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान कलाकार आणि निर्मात्यांवर कोविड -१९ मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करून जैसलमेरच्या पर्यटनस्थळांचे नुकसान केल्याचा आरोप आहे. स्थानिक सीजेएम कोर्टात आदित्य शर्माच्या वतीने अ‍ॅडव्होकेट कंवरराज सिंह यांनी चित्रपटाचे स्टारकास्ट अक्षय कुमार, जॅकलिन फर्नांडिस, कृती सेनन, अरशद वारसी आणि निर्माता साजिद नाडियाडवाला, विक्रांत टंडन यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.

या प्रकरणात कोर्टाने विक्रांत टंडन यांना समन्स बजावून बच्चन पांडे चित्रपटाच्या शूटिंगच्या मान्यतेची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याला उत्तर म्हणून अ‍ॅडव्होकेट दीपक चौहान यांनी चित्रपट निर्मात्यांच्या वतीने उत्तर सादर केले. ते म्हणाले की, तक्रारदाराने न्यायालयात आपले निवेदन नोंदवले नाही किंवा तक्रारीत नमूद केलेल्या तथ्यांबाबत कोणताही पुरावा सादर केलेला नाही. ही तक्रार केवळ कोर्टाची दिशाभूल करण्यासाठी आणि अर्जदारांना त्रास देण्यासाठी देण्यात आली आहे. जेव्हा तक्रार दाखल केली जाते तेव्हा फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 200 किंवा 202 चे पालन करणे आवश्यक असते आणि प्रक्रिया घेतल्यानंतरच न्यायालय आरोपीला समन्स बजावू शकते, या टप्प्यावर न्यायालयात पुराव्यांची कागदपत्रे मागू शकत नाहीत.

ज्यावर कोर्टाने निर्मात्याचा जवाब निकाली काढले आणि चित्रपट निर्मात्यांना शूटिंगच्या मान्यतेची कागदपत्रे सादर करण्यास सांगितले. या प्रकरणात, तक्रारदाराचे जवाब शनिवारीही नोंदवले जाईल. बच्चन पांडे हा चित्रपट २०१४ सालच्या तामिळ चित्रपट वीरमचा रिमेक आहे. दिग्दर्शक फरहाद सामजी या चित्रपटाचे दिग्दर्शन करीत आहेत.

हेही वाचा - 'शार्दुल’ आणि ‘सुमी’ ला नेहमीच इच्छा होती चित्रपटातून एकत्र काम करण्याची!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.