ETV Bharat / sitara

प्रकाश आंबेडकरांच्या साधेपणाची चिन्मय मांडलेकरला पडली भुरळ - Chinmay Mandlekar तोूाेू लाैे

चिन्मय मांडलेकर यांची भेट प्रकाश आंबेडकर यांच्याशी झाली. त्यांच्या साध्या राहण्याचे चिन्मयला आकर्षण वाटले. एका पक्षाचे प्रमुख असलेले आणि डॉ. बाबासोहेब आंबेडकरांचे नातू असलेले हे व्यक्तीमत्व आवडल्याचे चिन्मयने फेसबुकवर म्हटले आहे.

Chinmay Mandlekar meet Prakash Ambedkar
चिन्मय मांडलेकर आणि प्रकाश आंबेडकर
author img

By

Published : Dec 13, 2019, 11:25 PM IST

नागपूर - एका कामाच्या निमित्ताने नागपूरला गेलेला अभिनेता चिन्मय मांडलेकर विमानतळावर विमानाची प्रतिक्षा करीत होता. गर्दी जास्त असल्याने आणि विमानाला उशिर असल्यामुळे प्रवासी दाटीवाटीने बसले होते. चिन्मयला बसायला जागाच नव्हती. तो उभा होता आणि अचानक त्याला प्रकाश आंबेडकर दिसले. अर्थात तेही उभे होते.

Chinmay Mandlekar meet Prakash Ambedkar
चिन्मय मांडलेकर यांची फेसबुक पोस्ट

सामान्यपणे लहान नेतेदेखील हुजऱ्यांच्या गर्दीत दिसतात. मात्र, आंबेडकर साधेपणाने उभे होते. त्यांनाही बसायला जागा नव्हती. विशेष म्हणजे नागपूरच्या विमानतळाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव आहे. त्यांचाच नातू येथे तब्बल ४० मिनिटे सामान्य प्रवाशांप्रमाणे उभा होता. या गोष्टीचे अप्रूप चिन्मयला वाटले. यावर त्याने फेसबुकवर एक पोस्ट लिहिली असून त्याने काय लिहिलंय तुम्हीच वाचा.

चिन्मय लिहितो, "काल नागपूर विमानतळावर फ्लाईट ४० मिनिटं लेट. वेटिंग एरियात बसायला ही जागा नाही. ताटकळत उभा असताना, खांद्यावर सॅक, त्याच्या साईड पॉकेटमध्ये पाण्याची बाटली, साधा शर्ट, पॅन्ट अशी ही व्यक्ति दिसली. आधी वाटलं "आयला! हा माणूस सेम टू सेम प्रकाश आंबेडकरांसारखा दिसतो".

"पण फोनवर बोलतानाचा त्यांचा आवाज ऐकून कळलं "अरे, प्रकाश आंबेडकरच आहेत." महाराष्ट्राच्या राजकारणातलं गेल्या काही वर्षातला महत्वाचा नेता. पण बरोबर हुजर्‍यांचा लवाजमा नाही, बाऊनर्स वगैरे तर नाहीच नाहीत. कुठलीच वी.आय.पी ट्रीटमेंट नाही. एअरपोर्टवर बसायला ही जागा नसताना जवळ जवळ ४० मिनिटं ताटकळत उभे होते. अर्थात लोकं भेटत होती, फोटो काढत होती.

"आमची भेट झाल्यावर मनमोकळ्या गप्पा मारत उभे राहिलो. राजकीय भूमिका पटो न पटो, पण माणसाचा साधेपणा कमाल आहे! आज सामान्य पक्षीय पदाधिकारीदेखील लवाजमा घेतल्याशिवाय फिरत नाहीत, तिथे हा पक्षप्रमुख सामान्यासारखा पाठीवर सॅक मारून रांगेत उभा राहतो हे विलक्षण आहे. बाय द वे, ज्या एअरपोर्टवर हे झालं त्या एअरपोर्टला यांच्याच आजोबांचं नाव आहे. तरीही No VIP treatment! #Respect. — with Balasaheb Ambedkar."

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.