राष्ट्रीय आणि आंग्ल भाषेबरोबरच प्रादेशिक भाषांमधील मनोरंजनालाही भरपूर मागणी आहे. महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेमधील कार्यक्रमांना पसंती मिळते. त्यामुळेच राष्ट्रीय स्तरावरील मनोरंजनकर्त्यांनी मराठीकडेही मोर्चा वळविलेला आहे. ‘चिंगारी' या भारतातील प्राइम व्हिडिओ-शेअरिंग ॲपने ‘कडक एंटरटेनमेंट’ सोबत करार केला आहे. त्याद्वारे मराठी प्रेक्षकांसाठी विविध विषय आणि शैलींचा कंटेंट प्रदान करण्यात येणार आहे.
श्रुती अक्षय मुनोत आणि मयुरी स्वप्नील मुनोत या दोन महिला उद्योजिकांनी स्थापन केलेल्या कडक एंटरटेनमेंटने नुकतीच ही घोषणा केली. कडक एंटरटेनमेंटच्या उद्योजिका एकमेकींच्या जावा आहेत. या अनोख्या जोडीच्या नव्या कामगिरीचा लाभ चिंगारीला घेता येईल. तसेच या भागीदारीतनू प्रादेशिक कंटेंट लायब्ररीही अधिक समृद्ध केली जाईल. हे शॉर्ट व्हिडिओ ॲप प्रादेशिक अस्तित्व अधिक बळकट करण्यासाठी अनेक प्रयत्न करत आहे. कडक एंटरटेनमेंटसोबतची ही भागीदारी म्हणजे या दिशेने टाकलेले एक पाऊल असल्याचे बोलले जात आहे.
चिंगारी ॲपचे सह-संस्थापक आणि सीईओ सुमित घोष म्हणाले, की “रुढी-प्रथा मोडत, आमच्या युजर्ससाठी सर्वोच्च क्षमतेने उत्कृष्ट मनोरंजन पुरवणे, ही चिंगारीची ब्रँड फिलॉसॉफी आहे. कडक एंटरटेनमेंटची तत्त्वेही अशीच आहेत. त्यामुळे त्यांच्याशी आम्ही स्वाभाविकरित्या जोडले जाऊ शकतो. त्यांच्यासोबत काम करताना आम्हाला आनंद होत आहे.”
चिंगारी ॲपसोबतच्या भागीदारीविषयी बोलताना, कडक एंटरटेनमेंटच्या श्रुती अक्षय मुनोत आणि मयुरी स्वप्निल मुनोत म्हणाल्या, “ही भागीदारी करताना, विशेषत: विनोदी कंटेंटसाठी आम्ही खपू उत्साही आहोत. कडक मराठीकडे कंटेंट निर्मितीसाठी अनेक योजना असल्याने चिंगारीच्या युजर्सचे आणखी मनोरंजन होईल, याची आम्ही खात्री देतो. तसेच चिंगारी ॲपसोबत अनेक उपक्रमही आम्ही राबवणार आहोत. जास्तीत जास्त लोकांपर्यंत जास्तीत जास्त मनोरंजनाकरिता कडक मराठीचा ताजा कंटेंट चिंगारी ॲपच्या विस्तृत ग्राहकवर्गापर्यंत पोहोचेल. प्रेक्षकांना सर्वोत्कृष्ट कंटेंट देण्यासाठी दीर्घकालीन संबंधांची ही एक महत्त्वपूर्ण सुरुवात आहे. कोव्हिड-१९ नंतरच्या जगात, लोक असा कंटेंट शोधत आहेत, जो त्यांना पॉझिटिव्हिटी देईल आणि चिंगारीच्या लायब्ररीत कडक एंटरटेनमेंट याच गरजेची पूर्तता करेल. तसेच आमच्या मराठी प्रेक्षकांसाठी आणखी जास्त कंटेंट पुरवला जाईल.”
चिंगारी ॲपचे सीओओ दीपक साळवी म्हणाले, “समविचारी भागीदारांसोबत संबंध जोडणे नेहमीच आनंददायी असते. कडक एंटरटेनमेंट आमच्या सोबत आल्याने आमच्या मराठी लायब्ररीत वृद्धी झाली आहे. चिंगारीमध्ये सर्व ग्राहकांना आम्ही अधिक चांगला व उत्कृष्ट कंटेंट देण्याचा प्रयत्न करतो. तसेच आमच्या प्रादेशिक लायब्ररीतही वाढ करण्याचा प्रयत्न करतो. पुढेही असेच कार्य करत राहण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
दरम्यान, ‘चिंगारी’ आणि ‘कडक एंटरटेनमेंट’ एकत्र आल्यामुळे मराठी प्रेक्षकांना मनोरंजनासाठी अजून एक संधी उपलब्ध झाली आहे.