ETV Bharat / sitara

'छिछोरे' चित्रपटाची १०० कोटीच्या क्लबमध्ये एन्ट्री, सुशांतच्या करिअरमधला ठरला दुसरा सुपरहिट चित्रपट - sushant singh news

'छिछोरे' चित्रपटात सुशांतसोबत श्रद्धा कपूर, वरुण शर्मा, ताहिर राज भसिन, नविन पॉलिशेट्टी, तुषार पांडे, प्रतिक बब्बर, सहर्ष शुक्ला हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. कॉलेजमधील धमाल मस्ती या चित्रपटात पाहायला मिळाली.

'छिछोरे' चित्रपटाची १०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री
author img

By

Published : Sep 19, 2019, 11:10 AM IST

मुंबई - 'दंगल' चित्रपटाचे दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या 'छिछोरे' चित्रपटाचीही १०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री झाली आहे. १३ व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने १०२ कोटींची मजल मारली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाला टक्कर देण्यासाठी आयुष्मान खुरानाचा 'ड्रीमगर्ल' चित्रपट देखील प्रदर्शित झाला आहे. तरीही 'छिछोरे' चित्रपटाला प्रेक्षक चांगला प्रतिसाद देत आहेत.

'छिछोरे' चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यातही दमदार कमाई केली. पहिल्या दिवशी या चित्रपटाने अवघ्या ७.३२ कोटींची कमाई केली होती. मात्र, प्रेक्षकांच्या चांगल्या प्रतिसादामुळे हा चित्रपट १०० कोटींची कमाई करण्यात यशस्वी ठरला आहे.

  • #Chhichhore is 💯 Not Out... Solid trending - despite a strong opponent - increases its chances of sustaining at the BO till the biggies arrive [2 Oct]... [Week 2] Fri 5.34 cr, Sat 9.42 cr, Sun 10.47 cr, Mon 4.02 cr, Tue 4.11 cr. Total: ₹ 102.19 cr. #India biz.

    — taran adarsh (@taran_adarsh) September 18, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा-छिछोरेचा नवा व्हिडिओ तुम्हाला करुन देईल कॉलेजमधील दिवसांची आठवण

हा चित्रपट सुशांतच्या करिअरमधला दुसरा सुपरहिट चित्रपट ठरला होता. त्याचा 'एम. एस. धोनी - द अनटोल्ड स्टोरी' हा चित्रपट यापूर्वी ब्लॉकबस्टर ठरला आहे.

'छिछोरे' चित्रपटात सुशांतसोबत श्रद्धा कपूर, वरुण शर्मा, ताहिर राज भसिन, नविन पॉलिशेट्टी, तुषार पांडे, प्रतिक बब्बर, सहर्ष शुक्ला हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. कॉलेजमधील धमाल मस्ती या चित्रपटात पाहायला मिळाली.

हेही वाचा-'खिलाडी' कुमारची मेट्रो राईड, शेअर केला अनुभव

श्रद्धाच्या 'साहो' चित्रपटानेही १०० कोटीपेक्षा जास्त कमाई केली आहे. त्यामुळे यावर्षी तिच्या दोन्हीही चित्रपटांचा समावेश १०० कोटी क्लबमध्ये झाला आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.