मुंबई - बॉलिवूडमध्ये कलाकारांच्या अभिनयासोबतच त्यांच्या लूकवरही विशेष मेहनत घेतली जाते. चित्रपटात ते साकारत असलेली भूमिका पडद्यावर जिवंत करण्यासाठी हुबेहुब लूकही साकारावा लागतो. त्यामुळे प्रोस्थेटिक लूकच्या माध्यमातून कलाकारांचा लूक साकारला जातो. नुकताच कंगना रनौतच्या 'थलायवी' चित्रपटातील पहिला लूक समोर आला आहे. तिचा हा लूक पाहून सर्वच हैराण झाले. मात्र, अशाप्रकारचा प्रोस्थेटिक मेकअप करून यापूर्वीही बऱ्याच कलाकारांचा लूक साकारण्यात आला आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
अमिताभ बच्चन - ऋषी कपूर ( १०२ नॉट आऊट)
अमिताभ बच्चन हे देखील चित्रपटातील त्यांच्या लूकवरील प्रयोगासाठी लोकप्रिय आहेत. त्यांच्या '१०२ नॉट आऊट' या चित्रपटातील लूकही असाच काहीसा हटके असल्याचा पाहायला मिळाला. ऋषी कपूर यांनाही वयापेक्षा जास्त असलेली व्यक्तीरेखा साकारण्यासाठी असा मेकअप करावा लागला होता.
दीपिका पदुकोण (छपाक)
दीपिका पदुकोणचा आगामी 'छपाक' हा चित्रपटही बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटात ती अॅसिड हल्ल्यातील पीडिता लक्ष्मी अग्रवालच्या भूमिकेत दिसणार आहे. तिच्यासारखा चेहरा पडद्यावर दाखवण्यासाठी दीपिकावरही प्रोस्थेटिक मेकअप करण्यात आला आहे. तिचाही या चित्रपटातील फर्स्ट लूक समोर आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला होता.
राजकुमार राव (राबता)
सुशांत सिंग राजपूत आणि क्रिती सेनॉन यांची मुख्य भूमिका असलेला 'राबता' या चित्रपटात राजकुमार रावची विलनची भूमिका होती. या चित्रपटात त्याने ३२४ वर्ष जुन्या व्यक्तीची भूमिका साकारली होती. त्याच्याही लूकने सर्वांना आश्चर्यचकित केले होते.
हृतिक रोशन (धुम २)
हृतिकच्या 'धुम २'मधील त्याचेही वेगवेगळे चेहरे सर्वांना आठवत असतीलच. या चित्रपटात त्याने चोराची भूमिका साकारली होती. त्याच्या वेगवेगळ्या लूकसाठी प्रोस्थेटिक मेकअपचाच वापर करण्यात आला होता. व्ही.एफ.एक्सच्या माध्यमातूनही त्याचा लूक बदलण्यात आला होता.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">