ETV Bharat / sitara

पहिल्याच चित्रपटामुळे सुपरस्टार झाले होते 'हे' कलाकार, आता आहेत लाईमलाईटपासून दुर - akshay kumar

राहुल रॉय, भाग्यश्री, अनु अग्रवाल यांसारखे कलाकार देखील पहिल्याच चित्रपटातून सुपरस्टार झाले होते. मात्र, पुढे त्यांच्या करिअरला वेगळीच दिशा मिळाली.

पहिल्याच चित्रपटामुळे सुपरस्टार झाले होते 'हे' कलाकार, आता आहेत लाईमलाईटपासून दुर
author img

By

Published : Jul 13, 2019, 8:13 PM IST

मुंबई - ग्लॅमर आणि स्टारडमची चमक अशी असते, जी कोणत्याही कलाकाराला हवीहवीशी वाटते. मात्र, अनेकदा असे होते की एका रात्रीत सुपरस्टार झालेले कलाकार पुढे लाईमलाईटपासून दुर होतात. त्यांना पुढे ओळखणंही कठिण होते. राहुल रॉय, भाग्यश्री, अनु अग्रवाल यांसारखे कलाकार देखील पहिल्याच चित्रपटातून सुपरस्टार झाले होते. मात्र, पुढे त्यांच्या करिअरला वेगळीच दिशा मिळाली.

राहुल रॉय-
राहुल रॉयने वयाच्या २२ व्या वर्षी 'आशिकी' चित्रपटातून बॉलिवूड एन्ट्री घेतली होती. त्याचा पहिलाच चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला. मात्र, पुढे त्याच्या चित्रपटांना विशेष अशी प्रसिद्धी मिळाली नाही. त्यामुळे तो लाईमलाईटपासून दुर झाला.

Bollywood actors who became superstar from their first film
राहुल रॉय

अमिषा पटेल -

अमिषा पटेल हिने हृतिक रोशनसोबत 'कहो ना प्यार है' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तिचाही हा पहिलाच चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला. त्यानंतर २००१ मध्येही तिने 'गदर' चित्रपटात भूमिका साकारली होती. 'गदर' चित्रपटानेही त्यावेळी बरेच विक्रम रचले होते. मात्र, पुढे तिचे स्टारडम कमी झाले. आता ती प्रसिद्धीझोतात राहण्यासाठी बोल्ड फोटोशूटचा आधार घेते. यावरुन ती सोशल मीडियात ट्रोलही होते.

अमिषा पटेल

अनु अग्रवाल -
'आशिकी गर्ल' म्हणून अनु अग्रवालची ओळख होती. तिनेही राहुल रॉयसोबत 'आशिकी'मधुन बॉलिवूड पदार्पण केले होते. ती देखील एका रात्रीत स्टार बनली होती. असे असले, तरीही तिला पुढे ९ वर्षांपर्यंत चित्रपट मिळविण्यासाठी अथक प्रयत्न करावे लागले. पुढे तिच्या अपघातामुळे तिचे पूर्ण आयुष्यच बदलले. या अपघातात तिची स्मृती विस्मरली गेली. त्यामुळे तिच्या स्टारडमवर याचा फार परिणाम झाला.

राहुल रॉय आणि अनु अग्रवाल

अनु अग्रवाल

कुमार गौरव -
सुप्रसिद्ध अभिनेते राजेन्द कुमार यांचा मुलगा गौरव हा देखील सिनेसृष्टीत एका रात्रीत सुपरस्टार बनला होता. त्याचा पहिलाच चित्रपट 'लव्ह स्टोरी' खूप गाजला होता. त्यावेळी त्याचा आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये समावेश झाला होता. त्याची स्टाईलही तरुणाईमध्ये हिट झाली होती. पुढे त्याच्या चित्रपटांना फारसे यश मिळाले नाही. त्यामुळे तो सिनेसृष्टीपासून दुर झाला.

गौरव कुमार

भाग्यश्री

'मैने प्यार किया' चित्रपटातील भूमिकेमुळे भाग्यश्रीची मोठ्या प्रमाणात लोकप्रियता वाढली होती. सलमान खान आणि तिची केमेस्ट्री चाहत्यांच्या पसंतीस उतरली होती. आजही तिला याच चित्रपटामुळे ओळखले जाते. मात्र, लग्नानंतर भाग्यश्रीचे करिअर संपृष्टात आले.

स्टारडम विषयी अलिकडेच सलमान खानला देखील प्रश्न विचारण्यात आला होता, की त्याला स्टारडम गमावण्याची भीती वाटते का? यावर त्याने उत्तर दिले होते की 'एक ना एक दिवशी तर हे स्टारडम जाणारंच आहे. मात्र, वर्षानुवर्षे हे स्टारडम टिकवणं एक आव्हान आहे. शाहरुख, आमिर, अक्षय आणि अजय यांसारखे स्टार आपले स्टारडम बरीच वर्ष टिकवून ठेवू शकतात'.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.