मुंबई - अनुष्का शर्माची पहिली डिजिटल मालिका 'पाताल लोक' वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. नुकत्याच झालेल्या प्रकरणात भाजपचे आमदार नंदकिशोर गुर्जर यांनी पोलिस तक्रार देऊन अभिनेत्रीविरोधात कारवाईची मागणी केली आहे. आता अभिनेत्रीचा पती आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने अनुष्काला लवकरात लवकर घटस्फोटाची मागणी गुर्जर यांनी केली आहे!
स्थानिक मीडिया हाऊसशी संवाद साधताना भाजपच्या आमदाराने अनुष्का 'देशद्रोही' असल्याचे म्हटले आहे. विराट जर खरा देशभक्त असेल तर त्याने अनुष्काला घटस्फोट द्यावा, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
आमदार महाशयांनी पुढे म्हटलंय, ''देशापेक्षा कोणीच मोठे असू शकत नाही, मग अनुष्का शर्मा असो की विराट. विराट देशासाठी खेळलाय आणि देशाचे नाव उंचावले आहे. त्याने अनुष्काला तातडीने घटस्फोट द्यावा, असे मला वाटते.''
नंदकिशोर यांनी पाताल लोक या वेब सिरीजवर आपला निशाणा साधत म्हटलंय, ''सिरीजमध्ये पाकिस्तान, दाऊद इब्राहिम आणि आयएसआय यांच्या दखलीची गोष्ट आहे. उत्तर प्रदेशातील लोनी विधानसभा जागेवरून आमदार म्हणून विजयी झालेल्या गुर्जर यांनी पाताललोक या मालिकेत सनातन धर्मातील जाती आणि भारतीय एजन्सींचे चुकीचे चित्रण केल्याबद्दल हा राष्ट्रद्रोह असल्याचे म्हटले आहे. लोनी पोलीस ठाण्यामध्ये अनुष्का शर्माच्या विरोधात रासुका अंतर्गत तक्रार दाखल करण्यास सांगितले आहे.''
आमदारांनी पुढे लिहिलंय, ''बॉलिवूड अभिनेत्री आणि प्राईमवर प्रसारित झालेल्या वेब सिरीजची निर्माती अनुष्का हिने सिरीजमध्ये बालकृष्ण बाजपेयी नावाच्या गु्हेगाराशी संबंधित एका रस्त्याच्या उद्घाटनप्रसंगी माझा आणि इतर भाजप नेत्यांचा फोटो दाखवलाय. मी वर्तमानात भाजप आमदार आहे आणि माझ्या संमतीशिवाय माझ्या फोटोचा वापर करण्यात आलाय.''
यापूर्वीही मालिकेमध्ये जाती-आधारित शिवीचा वापर केल्याबद्दल गिल्डचे सदस्य आणि वकील विरेनसिंग गुरुंग यांनी अनुष्काला कायदेशीर नोटीस पाठविली आहे.