मुंबई - अमिताभ बच्चन यांचा 'ए बी आणि सी डी' हा चित्रपट अशावेळी रिलीज झाला जेव्हा कोरोना व्हायरसचा प्रार्दुर्भाव वाढायला सुरूवात झाली होती. त्यानंतर सिनेमा थिएटर्स बंद करण्याचा निर्णय झाला. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचलाच नाही. आता या चित्रपटाचा डिजिटल प्रीमियर अॅमॅझॉन प्राईमवर होणार आहे.
अक्षय बर्दापुरकर यांची निर्मिती असलेला आणि मिलिंद लेले यांनी दिग्दर्शित केलेल्या 'ए बी आणि सी डी' या चित्रपटात विक्रम गोखले महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. १ मे या महाराष्ट्र दिनाच्या दिवशी याचा डिजीटल प्रीमियर अॅमॅझॉन प्राईमवर होणार आहे.
हेही वाचा - लता मंगेशकर यांनी 'एसीपी प्रद्युम्न'वर जेव्हा रोखली होती पिस्तुल !!!
याबद्दल बोलताना बर्दापुरकर यांनी सांगितले, ''सध्याच्या स्थितीत लोकांची सुरक्षितता खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे अॅमॅझॉन प्राईमवर याचे डिजीटल स्ट्रिमिंग करणे आम्हाला योग्य वाटले.''
ते पुढे म्हणाले, ''प्राईम व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र दिनी आणि कामगार दि नी सिनेमा रिलीज करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.''
'ए बी आणि सी डी' हा चित्रपट ७० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने पार्टीत भेटलेल्या अमिताभ बच्चन आणि विक्रम गोखले या दोन दोस्तांची गोष्ट आहे.