मुंबई - गुलाबो सिताबो मधील अमिताभ बच्चन यांच्या व्यक्तिरेखेप्रमाणे दिसणाऱ्या एका म्हातार्याचा एक फोटो इंटरनेटवर प्रसिध्द झाला आहे. या दोघांमध्ये भरपूर साम्य दिसत असल्यामुळे नेटकरी चकित झाले आहेत.
दोघांचा कोलाज तयार करत एका नेटकऱ्याने 23 मे रोजी इन्स्टाग्रामवर ही प्रतिमा शेअर केली. फोटोबरोबरच अकाउंट मॅनेजरने लिहिले की, ''गुलाबो सिताबो चित्रपटातील अमिताभ बच्चन यांचा फर्स्ट लूक दिल्लीतील एका व्यक्तीशी अगदी मिळता जुळता आहे. दिल्लीतील एका व्यक्तीचे पोर्टेटचा फोटो मागील वर्षी जानेवारीत मी शेअर केला होता. त्याचा स्कार्फ, दाढी, चष्मा!''
माझे पोर्ट्रेट केरळमधील अलेप्पी येथील बँकर जो थॉमस यांना प्रेरणा देऊन गेले. त्यांनी सुंदर चित्र रेखाटले आणि काही दिवसांनी मला ते शेअर केले. हे चित्र चित्रपटातील व्यक्तीरेखेशी जुळणारे आहे, असे दावा करणाऱ्या तो फोटोग्राफरने म्हटले आहे.
सोशल मीडियावरील अनेक युजर्सना या फोटोमध्ये आणि गुलाबो सिताबोतील अमिताभच्या व्यक्तीरेखेमध्ये साम्य दिसते. याबद्दल असंख्य कॉमेंट्स मिळत आहेत. दोघांमधील साम्य विलक्षण असल्याचे लोकांनी म्हटलंय.
असे असले तरी चित्रपट निर्माते शुजित सरकार यांनी असा दावा केला आहे की व्यक्तिरेखेचा लूक रशियन कलाकार ओल्गा लॅरिओनोव्हाच्या वृद्ध व्यक्तीच्या पेन्सिल पोर्ट्रेटवरून प्रेरित आहे.