सातारा - चेक बाऊन्सप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अभिजीत बिचुकलेला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. सुट्टीकालीन न्यायाधीश आर. व्ही. पाटील यांच्यापुढे सुनावणी झाली होती. सुमारे एका तासहून अधिक सुरू असलेल्या युक्तीवादानंतर बिचुकलेला चेक बाऊन्स प्रकरणात न्यायालयाने जामीन मंजूर केला.
मात्र, २०१२ साली त्याच्यावर दाखल असलेल्या खंडणी प्रकरणाची सुनावणी सुरू होती. त्यावर न्यायालयाने जामीन फेटाळला आहे. त्यामुळे अभिजीत बिचुकलेच्या अडचणीत वाढ झाली आहे.
बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वातून घराघरात चर्चेचा विषय बनलेल्या अभिजीत बिचुकलेला आरे पोलिसांनी घरातून अटक केली होती.
आज (२२ जून) त्याला सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. चेक बाऊन्सप्रकरणी त्याला जामीन मिळाला आहे. मात्र, दुसऱ्या एका प्रकरणात तो अडकला. त्यामुळे या प्रकरणात आता आणखी कोणते वळण पाहायला मिळते, याची सर्वांना उत्सुकता आहे.