ETV Bharat / sitara

हॉलंडच्या ट्रिपमध्ये लहान अभिषेक हरवला होता, अमिताभ यांनी जागवल्या आठवणी

author img

By

Published : May 7, 2020, 1:00 PM IST

फॅमिलीसह हॉलंडच्या सुट्टीवर गेले असताना तेथील प्रसिध्द केकेनहॉफ गार्डनमधीलकाही फोटो अमिताभ यांनी शेअर केले आहेत. यावेळच्या आठवण जागवताना छोटा अभिषेक फुलांच्या बागेत कसा हरवला होता त्याचा किस्सा बिग बी यांनी सांगितला आहे.

Big B recalls how little Abhishek
अमिताभ यांनी जागवल्या आठवणी

मुंबई - अमिताभ बच्चन यांनी आपल्या सोशल मीडियावर काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. फॅमिलीसह हॉलंडच्या सुट्टीवर गेले असताना तेथील प्रसिध्द केकेनहॉफ गार्डनमधील हे फोटो आहेत.

अमिताभ बच्चन सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. १९७५ मध्ये अमिताभ यांनी आपपल्या परिवारासह हॉलंडची ट्रिप केली होती. याचे फोटो त्यांना इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

"आम्ही सर्व 'हॉर्टस कॉन्क्लुस' मध्ये राहात होतो... आपल्यातच भटकत होतो... आमच्या 'बागेतल्या बागेत' .. पण .. केकेनहॉफ, सर्वात वेगळी, सुंदर खुली गार्डन आहे," असे त्यांनी फोटोंच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे.

या ट्रिपच्यावेळी त्यांनी अभिषेक बच्चन हरवल्याचा एक रंजक किस्सा सांगितला आहे. बच्चन यांनी लिहिलंय, "१९७५ मध्ये जया, अभिषेक आणि श्वेता यांच्या काही स्वर्गीय अशा लहान मुलांच्या आठवणी .. आणि छोटासा अभिषेक एका गुच्छात, एका कियारीत पडला आणि जवळजवळ हरवला होता. .. .. तसे ते दिवस होते," असं त्यांनी पुढे लिहिलंय.

अमिताभ यांनी फुलांचे एक कोलाज पोस्टर शेअर करीत आपल्या हॉलंड ट्रिपला उजाळा दिला आहे.

केकेनहॉफ फ्लॉवर गार्डन जगातील सर्वात मोठ्या फुलांच्या बागांपैकी एक म्हणून ओळखली जाते आणि दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक इथे आकर्षित होत असतात.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.