मुंबई - अभिनेत्री भूमी पेडणेकरने दम लगाके हयशा चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यात तिला वजनदार व्यक्तीची व्यक्तीरेखा साकारायची होती. यासाठी तिने आपले वजन वाढवले. तब्बल ८९ किलो इतके वजन तिने यासाठी वाढवले होते. नंतर तिने हे वजन ५७ किलोवर आणले.
मुंबईत एका कार्यक्रमासाठी आलेल्या भूमीला वजन घटवण्याच्या रहस्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला.
भूमी म्हणाली, मी असं म्हणणार नाही की हे पार सोपे होते. परंतु हे नक्की सांगेन की, वजन वाढवण्यापेक्षा वजन घटवणे सोपे आहे. मला बऱ्याच गोष्टी सोडाव्या लागल्या. मी साखर खायचे बंद केले, ग्लुटेनयुक्त पदार्थ खाणे टाळले आणि संध्याकाळी सातनंतर काहीही खायचे बंद केले.
दम लगाके हयशाने भूमीचे आयुष्यच बदलून गेले. तिच्या व्यक्तीरेखेचीही खूप कौतुक झाले. कोणत्याही महिलेला तिच्या वजनावरुन तिच्याबद्दलची मते बनवली नाही पाहिजेत हा संदेश यातून देण्यात आला. तिचे शिक्षण, गुण आणि मानसिकता याची खरी ओळख करुन घेतली पाहिजे.
भूमीने 'सांड की आंख', 'बाला' आणि 'पति, पत्नि और वो' यासारख्या एका पाठोपाठ एक चित्रपटातून भूमिका साकारल्या आहेत.
यावर्षी तिचे 'शुभ मंगल ज्यादा सावधान' आणि 'भूत भाग एक: द हॉन्टेड शिप' हे चित्रपट रिलीज झाले. आगामी 'दुर्गावती' चित्रपटात ती झळकणार आहे.